Kareena-Saif Photos : बॉस लेडी लूकमध्ये करीनाचा हटके लूक; तर सैफच्याही लूकनं वेधलं सगळ्यांचं लक्ष
आपल्या फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट लूकने करिना इव्हेंटमध्ये सगळ्यांपेक्षा जास्त उठून दिसली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया इव्हेंटमध्ये प्राजक्ता कोळी, मसाबा गुप्ता, सिकंदर खेर, मिथिला पालकर असे अनेक स्टार्सही पोहोचले होते. पण या सगळ्यात करीनाच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.
करीना कपूर खानने इव्हेंटमध्ये पर्पल कलरचा पँट सूट परिधान केला होता आणि स्लीक बनसह तिचा लूक पूर्ण केला होता.
फॅशन आणि स्टाईलमध्ये करीना कपूर खानला टक्कर देत, सैफ अली खानने रिप्ड डेनिम जीन्स आणि जॅकेटमधला लूक कॅरी केला होता.
बॉलिवूडचं हे प्रेमळ कपल आपल्या केमिस्ट्रीनेच नव्हे तर आपल्या स्टाईल स्टेटमेंटनेही प्रसिद्ध आहे.
ब्लॅक सनग्लासेस घालून सैफ अली खानने मीडियाला अनेक पोज दिल्या आणि त्याचा लूकही खूप फ्लॉन्ट केला.
वयाच्या 52 व्या वर्षीही सैफ अली खान फॅशनच्या बाबतीत आघाडीवर आहे. आजही अनेक तरुणी सैफच्या चाहत्या आहेत.