Kapil Sharma Diwali Celebration: दिवाळीला कपिल शर्माचं घर नववधूसारखं सजलं, पाहा त्याच्या घराच्या बाल्कनीचे फोटो

Kapil Sharma Diwali Celebration: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या घरात दिवाळीची तयारी जोरात सुरू आहे. संपूर्ण घर नवरीसारखे सजवले आहे. घरात भरपूर दिवे लावण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांचे घर प्रकाशाने उजळून निघाले आहे. कपिल शर्माने लाइट्सने सजलेल्या त्याच्या बाल्कनीचे फोटो शेअर केले आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कपिल शर्माने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या घराची बाल्कनी दिसते. त्यांच्या घरावर सुंदर रोषणाई करण्यात आली आहे.

हे फोटो शेअर करत कपिल शर्माने 'फेस्टिव्हल ऑफ लाईट्स' असं कॅप्शनमध्ये लिहिले आहे. त्याच्या बाल्कनीत अनेक झाडे असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे. ज्यावर दिवे चमकत आहेत.
कपिल शर्माच्या बाल्कनीमध्ये गौतम बुद्धाची एक मोठी मूर्तीही दिसते, ज्यामुळे त्यांची बाल्कनी अधिक सुंदर होत आहे, या मूर्तीच्या मागेही लहान-लहान रोपे दिसून येतायत
कपिल शर्मानेही गेल्या वर्षी दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते ज्यात तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासह दिसत होता.
कपिल शर्माने डिसेंबर 2018 मध्ये गर्लफ्रेंड सोबत लग्न केले. त्यांना दोन मुले असून मुलीचे नाव अनैरा आणि लहान मुलाचे नाव त्रिशान आहे.