Kanika Kapoor Wedding : प्रसिद्ध गायिका कनिका कपूरच्या विवाह सोहळ्याचे खास क्षण!
Kanika Kapoor Wedding : प्रसिद्ध गायिका कनिका कपूरचा (Kanika Kapoor) नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे. (photo:/kanik4kapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकनिकानं गौतम हथिरामानीसोबत (Gautam Hathiramani ) शुक्रवारी (20 मे)लग्नगाठ बांधली. कनिका आणि गौतम यांचा विवाह सोहळा लंडन येथे पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (photo:/kanik4kapoor/ig)
कनिका ही 43 वर्षाची आहे. बेबी डॉल या गाण्यामुळे कनिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (photo:/kanik4kapoor/ig)
गेली काही वर्ष कनिका ही गौतम हथिरामानीला डेट करत होती. गौतम हा एक बिझनेसमॅन आहे. संगीतकार मनमीत सिंहनं कनिका आणि गौतम यांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यामधील फोटो शेअर करुन मनमीतनं कनिकाला शुभेच्छा दिल्या.(photo:/kanik4kapoor/ig)
कनिकानं पिंक लेहेंगा आणि गोल्डन ज्वेलरी असा रॉयल लूक लग्न सोहळ्यासाठी केला होता.(photo:/kanik4kapoor/ig)
किनकाच्या चिट्टींया कलाईयां, टुकूर टुकूर, गेंदा फूल या गाण्यांना देखील विशेष पसंती मिळाली.(photo:/kanik4kapoor/ig)
राज चंदोक या पहिल्या पतीसोबत किनकानं 2012 साली घटस्फोट घेतला. कनिका आणि राजला तीन मुलं आहेत. त्यानंतर कनिकता मुंबईमध्ये आली. तिचं 'जुगनी जी' हे गाणं रिलीज झालं. कनिकाच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती. (photo:/kanik4kapoor/ig)