सूर्या आणि बॉबी देओल स्टारर Kanguva का पाहावा? 'ही' 5 मोठी कारणं बनवतात Must Watch

Kanguva 5 Reasons To Watch: सूर्या, बॉबी देओल स्टारर कांगुवा 12 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. जर तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल, तर फक्त 5 कारणं तुम्हाला कंगुवा पाहण्यास भाग पाडू शकतात. ती कोणती?

Kanguva

1/8
सूर्याचा दमदार अभिनय: साऊथ सुपरस्टार सूर्या त्याच्या वर्सटाईल अभिनयासाठी आणि इमोशन्ससाठी ओळखला जातो. कांगुवा चित्रपटात त्याच्या अभिनयाला आणखी एक नवा आयाम मिळतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या या व्यक्तिरेखेसाठी सूर्यानं स्वत:ला पूर्णपणे बदलून टाकलं आहे. त्याची मेहनत त्याच्या अभिनयातून स्पष्टपणे दिसून येते.
2/8
पॅन इंडिया अपीलचा अनुभव: तामिळ चित्रपटसृष्टीत सुर्याचं खूप मोठा चाहता वर्ग आहे. यासोबतच हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात त्याचे चाहते पाहायला मिळतात.
3/8
जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स: कांगुवा चित्रपटात स्फोटक ॲक्शन सीक्वेन्स आहेत, जे प्रेक्षकांना त्यांच्या जागेवरून हलू देत नाहीत. यात मार्शल आर्ट्स, मोठ्या प्रमाणावर लढाईची दृश्य आणि स्फोटक स्टंट समाविष्ट आहेत, जे चित्रपटाच्या ॲक्शन कोरिओग्राफीचा एक प्रमुख भाग आहेत. हे सीक्वेन्स मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी खास तयार केले गेले आहेत, जेणेकरून त्यांचा प्रभाव जाणवू शकेल.
4/8
ग्रँड व्हिज्युअल: कांगुवा चित्रपटाचे दिग्दर्शक शिव यांनी चित्रपटात उत्कृष्ट व्हिज्युअल वापरले आहेत, जे प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतील. वेत्री यांनी प्रगत तंत्रज्ञान आणि जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्ससह चित्रपटाचं चित्रीकरण केलं आहे, ज्यामुळे क्लासी विज्युअल इफेक्ट्सचा अनुभव मिळतो. युद्धाचे क्लासी सीन्स आणि लँडस्केप्समुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट बनते.
5/8
धमाकेदार स्टोरीलाईन: कंगुवाच्या कहाणीमध्ये एक जबरदस्त आणि इमोशनल थ्रील आहे. या फिल्ममध्ये अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्सचं उत्तम कॉम्बिनेशन आहे, जे प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत बांधून ठेवतात. चित्रपटात काही ट्वीस्ट अॅन्ड टर्न्स आहेत, यामुळे नजर हटत नाही.
6/8
कंगुवामध्ये बॉबी देओलचा दमदार परफॉर्मन्सही पाहायला मिळतो. बॉबी देओल पुन्हा एकदा व्हिलनच्या रुपात झळकला असून या चित्रपटातलं त्याचं रुप पाहून पायाखालची जमीन हादरून जाते.
7/8
सूर्याच्या या फिल्मपासून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. सूर्याचा समावेश साऊथच्या टॉप अॅक्टर्समध्ये होतो आणि त्याच्या या फिल्मची वाट बऱ्याच काळापासून चाहते पाहात होते.
8/8
आता फिल्म कमाईच्या बाबातीत काय धमाल करणार? हे येत्या काळात नक्कीच पाहायला मिळेल.
Sponsored Links by Taboola