Kangana Ranaut : कंगना रनौतचा व्हेकेशन मोड ऑन; शेअर केले खास फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'धाकड' (Dhaakad) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. जबरदस्त अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (photo:kanganaranaut/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चित्रपटाच्या अपयशानंतर आता कंगना रनौतने कामातून ब्रेक घेतला आहे. मागील बराच काल ती चित्रपटांच्या कामात व्यस्त होती. मात्र, आता कंगनाने स्वत:साठी वेळ काढला आहे. सध्या अभिनेत्री तिच्या कुटुंबासह फिरण्याचा आनंद लुटत आहे.(photo:kanganaranaut/ig)
नुकतीच कंगना रनौत तिच्या कुटुंबासह पिकनिकला गेली होती, ज्याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगना तिची बहीण रंगोली आणि पुतण्या पृथ्वीराजसोबत धमाल करताना दिसत आहे. (photo:kanganaranaut/ig)
काही फोटोंमध्ये कंगना या सुंदर ठिकाणी कॅमेऱ्यासाठी फोटो पोज देत आहे. एका छायाचित्रात कंगना तिचा पुतण्या पृथ्वीराजसोबत धमाल करताना दिसत आहे. अशाच आणखी एका फोटोत कंगना आणि रंगोली निसर्गाचा आनंद लुटताना दिसते आहेत.(photo:kanganaranaut/ig)
या फोटोंसोबत कंगना रनौतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या आवडत्या ठिकाणी माझ्या कुटुंबासोबत ब्रेक डे खूप आवश्यक आहे... आणि हवामानही चांगले होते... सुंदर दिवस.' कंगना रनौतचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. कंगनाच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत, तर काही लोकांनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत.(photo:kanganaranaut/ig)
'धाकड' फ्लॉप झाल्यानंतर, कंगनाने तिच्या पुढच्या चित्रपटावर काम सुरू केले. या चित्रपटाचे नाव 'इमर्जन्सी' आहे. 'इमर्जन्सी' हा चित्रपट पिरियोडिक ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेली आणीबाणी आणि 1 जून 1964 रोजी झालेले ऑपरेशन ब्लूस्टार हे दोन मोठे निर्णय दाखवण्यात येणार आहेत. (photo:kanganaranaut/ig)
या चित्रपटात कंगना रनौत, इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाशी संबंधित अधिकची माहिती अद्याप शेअर करण्यात आलेली नाही.(photo:kanganaranaut/ig)