Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतची पुन्हा सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, म्हणाली..
वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut) वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. (photo: kanganaranaut/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केले होते. (photo: kanganaranaut/ig)
या वक्तव्यानंतर अनेकांनी कंगनाला ट्रोल केले. अनेकांनी तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली होती. (photo: kanganaranaut/ig)
या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत कंगना सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहे. नुकतीच कंगनाने एक पोस्ट सोशल मीडियावर केली. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. (photo: kanganaranaut/ig)
इंस्टाग्रामवर कंगनाने एका आर्टिकलचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहीले, 'तुम्ही एकतर गांधीजींचे फॅन होऊ शकता किंवा नेताजींचे समर्थक. तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय स्वत: घ्या.' (photo: kanganaranaut/ig)
कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये लिहीले, 'जे स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्यांना त्यांनी आपल्या मालकांकडे सोपवले. ते सत्तेचे भुकेले आणि धूर्त होते त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. हे तेच लोक होते ज्यांनी आपल्याला शिकवले की जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल त्यांच्यासमोर ठेवा, असं केल्याने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशाने स्वातंत्र्य मिळत नाही, फक्त भीक मागते, विचार करून तुमचे हिरो निवडा.' (photo: kanganaranaut/ig)
पुढे कंगना म्हणाली, 'गांधीजींनी भगत सिंह, सुभाष चंद्र बोस यांचे कधीच समर्थन केले नाही. काही पुरावे आहेत, ज्यावरून वाटते की गांधीजींची इच्छा होती की, भगत सिंग यांना फाशी मिळावी. (photo: kanganaranaut/ig)