Jennifer Lopez Engagement: तीन घटस्फोटांनंतर जेनिफर लोपेझ पुन्हा बंधनात!
(फोटो: jlo/ig)
1/6
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून सर्वसामान्यांसोबतच मनोरंजन विश्वातील स्टार्सही लग्न बेडीत अडकत आहेत. बॉलिवूड स्टार्स आलिया आणि रणबीर येत्या 17 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे.(फोटो: jlo/ig)
2/6
त्याचबरोबर आता हॉलिवूडमधील एका स्टार कपलनेही ‘एंगेजमेंट’ केली आहे.(फोटो: jlo/ig)
3/6
हॉलिवूडचे हे जोडपे दुसरे कोणी नसून अभिनेत्री जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि अभिनेता बेन ऍफ्लेक (Ben Affleck) आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.(फोटो: jlo/ig)
4/6
जेनिफर लोपेझने तिच्या एंगेजमेंटची अंगठी दाखवत एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यांच्या एंगेजमेंटच्या बातमीची पुष्टी केली आहे.(फोटो: jlo/ig)
5/6
तिने व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना लिहिले की, ‘हे जाहीर मला खूप आनंद होतो आहे...’(फोटो: jlo/ig)
6/6
बेन आणि जेनिफर यांनी याधीही 2002 मध्ये एकमेकांना डेट केले होते. त्यावेळीही दोघांनी एंगेजमेंट केली होती. पण, ते दोन वर्षांनी दोघे वेगळे झाले होते. याआधी जेनिफरने तीन वेळा लग्न केले आहे. तिने 1997मध्ये ओझानी नोआशी लग्न केले, जे अवघ्या एका वर्षानंतर मोडले. यानंतर तिने 2001मध्ये क्रिस जडशी लग्न केले, जे दोन वर्षांनी मोडले. जेनिफरने 2004 मध्ये मार्क अँथनीसोबत तिसरे लग्न केले आणि तब्बल 10 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. आता पुन्हा एकदा बेन आणि जेनिफर यांनी एकत्र येत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.(फोटो: jlo/ig)
Published at : 10 Apr 2022 02:53 PM (IST)