Jaya Bachchan Net Worth: जया बच्चन यांच्या संपत्तीची चर्चा; जाणून घ्या!
सध्या जया बच्चन यांच्या संपत्तीची चर्चा सुरु आहे. दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार हेमा मालिनी यांची संपत्ती देखील जया बच्चन यांच्यापेक्षा कमी आहे.
Continues below advertisement
(photo: jaya_bachchan_/ig)
Continues below advertisement
1/8
बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्या जया बच्चन (Jaya Bachchan) या त्यांच्या अभिनयासह त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी देखील ओळखल्या जातात. (photo: jaya_bachchan_/ig)
2/8
राजकारणात जरी सक्रिय असल्या तरीही जया बच्चन या अभिनय क्षेत्रातही अजून सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी जया बच्चन (Jaya Bachchan Net Worth) या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.(photo: jaya_bachchan_/ig)
3/8
सध्या जया बच्चन यांच्या संपत्तीची चर्चा सुरु आहे. दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार हेमा मालिनी यांची संपत्ती देखील जया बच्चन यांच्यापेक्षा कमी आहे. (photo: jaya_bachchan_/ig)
4/8
दरम्यान जया बच्चन या पाचव्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून जात आहेत. त्या गेल्या चार वेळा समाजवादी पक्षाकडून राज्यसभेच्या खासदार होत्या.(photo: jaya_bachchan_/ig)
5/8
या पक्षातून पुन्हा त्यांनाच राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. जया बच्चन यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या चल आणि स्थावर मालमत्तेविषयी माहिती दिली आहे. या सगळ्यानंतर जया बच्चन यांच्या संपत्तीची बरीच चर्चा होऊ लागली. (photo: jaya_bachchan_/ig)
Continues below advertisement
6/8
जया बच्चन यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये एकूण 1001 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं आहे. तसेच जया बच्चन यांच्या 105.64 कोटी रुपये थकबाकी असल्याचं म्हटलं. हे पत्र त्यांनी 2018 मध्ये दाखल केले होते. (photo: jaya_bachchan_/ig)
7/8
जया बच्चन यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रामध्ये 9 लाख रुपयांचे पेन आणि 51 लाख रुपयांची घड्याळं असल्याचंही सांगितलं आहे. अमिताभ यांच्याकडे 3.4 कोटी रुपयांची घड्याळं आहेत.(photo: jaya_bachchan_/ig)
8/8
अभिनेत्री हेमा मालिनी या देखील लोकसभेवर खासदार आहे. हेमा मालिनी यांनी त्यांच्या 2019 च्या निवडणुकीच्या शपथपत्रात संपत्तीचा तपशील दिला होता. त्यानुसार हेमा मालिनी यांच्याकडे 249 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यापैकी 114 कोटी रुपये हेमा मालिनी यांचे पती धर्मेंद्र यांची 135 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. (photo: jaya_bachchan_/ig)
Published at : 15 Feb 2024 04:50 PM (IST)