धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह बाथटबमध्ये आढळला, फॅन्स सुन्न
Miho Nakayama Death- सिनेसृष्टीत मोठी प्रसिद्धी मिळाल्यानंतर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा अचानक मृत्यू झालेला आहे. काही कलाकारांच्या मृत्यूचे तर कारणही समजू शकलेले नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजपानची अभिनेत्री आणि गायिका मिहो नायाकामा हिच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मिहो नायाकामा यांचा मृत्यू झाला आहे.
नायाकामा यांचा मृतदेह बाथटबमध्ये आढळल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
मिहो नायाकामा 54 वर्षांच्या होत्या. टोक्योमध्ये राहत्या घरात बाथरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळला आहे.
मिहो नायाकामा लव्ह लेटर या चित्रपटामुळे सगळीकडे ओळखल्या जातात. 1980-90 च्या दशकात त्या जपानी सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध चेहरा होत्या.
त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नसून त्यांच्या अशा अचानक मृत्यूमुळे त्यांचे फॅन्स सुन्न झाले आहेत.
मिहो नायाकामा