Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरचा हटके लूक; इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो

Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरचा हटके लूक इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो

Janhvi Kapoor

1/10
Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळाली आहे. आता देखील तिने चाहत्यांसाठी काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती पाढंऱ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
2/10
जान्हवी कपूर 20 मे 2025 रोजी 78 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळाली. तिच्या 'होमबाउंड' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी रेड कार्पेटवरुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
3/10
अभिनेत्री जान्हवी कपूर केवळ आपल्या सौंदर्यामुळेच नव्हे, तर अभिनयाच्या कौशल्यामुळेही प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
4/10
जान्हवीला सिनेक्षेत्रातील पार्श्वभूमी होती. तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि वडील निर्माता बोनी कपूर यांचं नाव भारतीय चित्रपटसृष्टीत आदराने घेतलं जातं.
5/10
जान्हवीने आपलं शालेय शिक्षण मुंबईतील इकोल मोंडियल स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर अभिनयाची अधिक तांत्रिक आणि सखोल शिकवण घेण्यासाठी तिने अमेरिकेतील ‘ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये प्रवेश घेतला. हेच ते शिक्षण आहे ज्याने तिच्यातील अभिनयाचा खऱ्या अर्थाने विकास केला.
6/10
2018 मध्ये 'धडक' या चित्रपटातून जान्हवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हा चित्रपट मराठीतील 'सैराट'चा हिंदी रिमेक होता आणि जान्हवीची भूमिका खूपच चर्चेत आली. तिच्या अभिनयावर अनेकांनी मतं व्यक्त केली, पण बहुसंख्य प्रेक्षक आणि समीक्षकांनी तिच्यातील प्रामाणिक प्रयत्न ओळखले.
7/10
त्यानंतर 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या बायोपिक चित्रपटात जान्हवीने महिला वैमानिकाची भूमिका साकारली. ह्या भूमिकेत तिने जबरदस्त समर्पण दाखवलं. या चित्रपटामुळे ती केवळ स्टारकिड नाही, तर मेहनती कलाकारही आहे हे सिद्ध झालं. 'रूही', 'गुड लक जेरी', 'मिली', 'बवाल' यांसारख्या विविध भूमिकांमधून तिने आपली वैविध्यपूर्णता दाखवली आहे.
8/10
जान्हवीचा फॅशन सेन्सही खूप चर्चेत असतो. 2025 मध्ये तिने पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. तिचा पारंपरिक भारतीय पोशाख आणि तिच्यात दिसणारी श्रीदेवीची झलक अनेकांना भावली.
9/10
जान्हवीचं वैयक्तिक आयुष्यसुद्धा काहीसं चर्चेतील आहे. शिखर पहाडियासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा अनेकदा रंगली आहे.
10/10
2024 मध्ये ती 'उलझ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आजारी पडली होती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, तिच्या कामावरील समर्पणामुळे ती लवकरच पुन्हा कामावर परतली.
Sponsored Links by Taboola