PHOTO: फोटोशूटसाठी जान्हवी कपूर झाली बोल्ड, लाल गाऊन मध्ये दिल्या क्लासी पोज!
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर देखील तिची दिवंगत आई श्रीदेवी यांच्याप्रमाणेच सुपर टॅलेंटेड आहे. कोणतीही व्यक्तिरेखा ती अतिशय चांगल्या पद्धतीने साकारू शकते हे तिने फार कमी वेळात सिद्ध केले आहे.(photo:janhvikapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलहान वयातच जान्हवीने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. (photo:janhvikapoor/ig)
जान्हवी तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि तिच्या नवीन फोटोशूटची झलक चाहत्यांसह शेअर करत असते. आता गुरुवारी पुन्हा एकदा जान्हवीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा चढवला आहे. (photo:janhvikapoor/ig)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर रेड कलरच्या चमकदार गाऊनमध्ये दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग उंच बूट घेतले आहेत. जान्हवीने तिचा गाऊन आणि लुक फ्लॉंट करताना एकामागून एक बोल्ड पोज दिल्या आहेत. (photo:janhvikapoor/ig)
प्रत्येक फोटोत ती सुंदर दिसत आहे. जान्हवीच्या या फोटोंवर अवघ्या काही मिनिटांत लाखो लाईक्स आले आहेत. (photo:janhvikapoor/ig)
जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच तिचे वडील बोनी कपूर निर्मित 'मिली' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय जान्हवी सध्या 'गुड लक जेरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (photo:janhvikapoor/ig)
यानंतर ती 'दोस्ताना 2', 'बावल' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.(photo:janhvikapoor/ig)