Jai Jai Swami Samarth: स्वामींची लीला अगाध... जय जय स्वामी समर्थ मालिकेत उर्मिलाची 'अग्नीपरीक्षा', स्वामींच्या कृपेने मिळाली नवसंजीवनी

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) जय जय स्वामी समर्थ (Jai Jai Swami Samarth) ही मालिका आजवर अनेक आध्यात्मिक आणि भावनिक क्षणांनी सजली आहे.

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track

1/12
पण नुकत्याच प्रसारित झालेल्या एका महत्त्वाच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनी अनुभवला निखळ भक्ती, आध्यात्मिक विस्मय आणि भावनांचा गुंता.
2/12
उर्मिलाची 'अग्नीपरीक्षा' ही केवळ कथानकातील घटना नव्हे, तर तिच्या श्रद्धेचा, निष्ठेचा आणि धैर्याचा अग्नितून गेलेला निर्णायक क्षण ठरतो.
3/12
गावकरी, रावसाहेब, अंबरीश, अनुसूया आणि इतर सगळे स्वामींच्या समोर उभे असताना उर्मिलाला अग्नीप्रवेशाची तयारी असल्याचं ती स्पष्ट करते.
4/12
तिचा आवाज ठाम, चेहरा शांत आणि मनोबल अटळ - "माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे… जे काही ते सांगतील, तेच माझं अंतिम सत्य." तिचा हा निर्णय सगळ्यांना हादरवून टाकतो. कपिला आणि बाळप्पाही चकित होतात.
5/12
बाळप्पा म्हणतो, "गुरुच्या अर्ध्या वचनात आहे म्हणणं आणि प्रत्यक्षात ती तयारी असणं वेगळं… मी उर्मिलाला नमन करतोय."
6/12
तेवढ्यात अग्नीकुंड धगधगू लागतं… उर्मिला हात जोडून त्यात प्रवेश करते. अंबरीश, अनुसूया, रावसाहेब यांचा टाहो फुटतो, "उर्मिला…"
7/12
सगळ्यांच्या डोळ्यांसमोर जणू तिचं भस्मसात होणं घडतं. पण… अचानक आकाशातून घुमतो तारक मंत्र. ज्वाळा शांत होतात आणि त्यात उभी असते उर्मिला - तिच्या मागे स्वामींचा तेजस्वी रूप.
8/12
"जिसकी नीयत सच्ची, जो हमारा बच्चा, उसे आग का डर कैसा?" या स्वामींच्या शब्दांनी सर्वजण भारावून जातात. उर्मिलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आनंदाचे, विश्वासाचे, कृपेसिद्धतेचे.
9/12
उर्मिलाचं पात्र आता केवळ श्रद्धेचं नव्हे, तर संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरतं.
10/12
स्वामींच्या कृपेवर असलेला विश्वास हा चमत्कारी ठरतो अग्नीही तिचं काहीही वाकडं करू शकत नाही.
11/12
या थरारक क्षणांनी सजलेला जय जय स्वामी समर्थ मालिकेचा एपिसोड प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालतोय.
12/12
मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता कोणता नवसंकेत येणार? उर्मिलाच्या या तपस्विनी रुपामागे दडलेली नवी कथा काय उलगडणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Sponsored Links by Taboola