Bigg Boss: बिग बॉस 18'मध्ये झळकलेल्या स्पर्धकांनी गुपचूप उरकला साखरपुडा? अभिनेत्रीची आई सर्वांसमोर म्हणाली...
बिग बॉस 18मध्ये झळकलेल्या स्पर्धक वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांचा साखरपुडा झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असतानाच आता या प्रकरणावर ईशा सिंगच्या आईने थेट प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement
bigg boss
Continues below advertisement
1/9
‘बिग बॉस 18’दरम्यान ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा झाली होती. घरात असताना दोघांचा बॉन्ड प्रेक्षकांना खूप आवडला होता.
2/9
शो संपल्यानंतरही त्यांची मैत्री कायम असून, दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. याच कारणामुळे अलीकडेच दोघांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
3/9
या चर्चांवर ‘टेली टॉक’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा सिंगची आई रेखा सिंग यांनी मौन सोडत स्पष्ट भूमिका मांडली आहे. चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
4/9
मुलाखतीदरम्यान रेखा सिंग नाराज आणि अस्वस्थ दिसत होत्या. त्या म्हणाल्या,“जेव्हा ओळखीची माणसं अशा गोष्टी लिहू लागतात, तेव्हा खूप धक्का बसतो. नेमकं काय चाललंय असं वाटतं. माझं नाव घेण्याआधी किमान मला विचारायला हवं.”
5/9
त्यांनी पुढे सांगितलं,“लोक काहीही लिहितात. अनेकदा मी दुर्लक्ष करते. 50 गोष्टी चांगल्या लिहिल्या जातात आणि 50 चुकीच्या.
Continues below advertisement
6/9
आम्ही चांगल्याकडे लक्ष देतो. पण जर माझं नाव वापरलं जात असेल, तर मी ईशाच्या लीगल टीमशी बोलले आहे. यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे.”
7/9
विशेष म्हणजे, ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा यांचे एकत्र फोटो जेव्हा-जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, तेव्हा-तेव्हा त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
8/9
मात्र, दोघेही नेहमीच एकमेकांना चांगले मित्र असल्याचं सांगत आले आहेत.
9/9
‘बिग बॉस 18’मध्येही दोघे एकमेकांसाठी ठामपणे उभे राहताना दिसले होते.
Published at : 20 Dec 2025 02:46 PM (IST)