Indrayani Colours Marathi Serial Track: इंद्रायणी मालिकेत नवा ट्वीस्ट, इंदू अन् अधू यांच्या नव्या नात्याची सुरुवात; थाटामाटात पार पडणार लग्नसोहळा!
Indrayani Colours Marathi Serial Track: लग्न म्हणजे, नव्या आयुष्याची सुरुवात. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आणि हाच क्षण आता आपल्या अधू आणि इंदूच्या आयुष्यात आला आहे.
Indrayani Colours Marathi Serial Track
1/12
मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचं लग्न होणार आहे. ज्या क्षणाची वाट अधूसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे. एकीकडे इंदू आणि अधू यांच्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे. पण, गोपाळ हे पचवू शकेल का?
2/12
गोपाळ आणि इंदूच्या नात्यात अनेक अनपेक्षित वळणं आली, कधी गैरसमज तर कधी प्रेम तर कधी भांडणाची वादळं, कधी दुरावा. शेवटी गोपाळनं इंदूला शेवटचा पर्याय दिला की, लग्न झाल्यावर मुंबईमध्ये स्थायिक होऊया पण इंदूला ते मान्य नव्हते.
3/12
विठूची वाडी, तिची माणसं आणि तिचे शाळेचं स्वप्नं सोडून तिला जाणे मान्य नव्हते.
4/12
हे घडत असतानाच व्यंकू महाराजांना कळणं अधूचे इंदूवर जीवापाड प्रेम आहे आणि त्यांनी इंदूला अधूशी लग्नसाठी विचारणा करणं. आणि हे होताच इंदूची झालेली द्विधा मनःस्थिती अखेर विठू पंढरपूरकरने सोडवली. इंदूने अधूसोबत लग्नासाठी होकार दिला असून ती आता तिच्या निर्णयावर ठाम आहे.
5/12
आता अखेर तो शुभ दिवस आला आहे. मंडप सजला आहे, तोरण लागली आहेत. मुहूर्त देखील निघाला आहे, स्थळ देखील निश्चित झाले आहे. तेव्हा आपल्या इंदू - अधूच्या लग्नाला नक्की यायचं हा!
6/12
अधू-इंदू यांचा विवासोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी इंदूचा खास मराठमोळा लूक असणार आहे नऊवारी साडी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये इंदू खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे.
7/12
लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे. होम, सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पार पडणार आहेत. खऱ्या अर्थाने अधूला इंदूची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे. इतक्या दिवसांनंतर या दोघांच्या आयुष्यात आलेला हा आनंद असाच टिकून राहो अशीच ईश्वर चरणी प्रार्थना !
8/12
आनंदीबाई म्हणजेच अनिता दाते या लग्नसोहळ्याबाबत बोलताना म्हणाली की, "आमच्या मालिकेत आता अधोक्षज आणि इंद्रायणीच्या लग्नाचं शूटिंग सुरू आहे. जे खूपच थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीनं पार पडणार आहे. ज्यासाठी उत्तम साड्या, नवीन कपडे, दागिने यांची खरेदी केली आहे. संपूर्ण विठूची वाडी लग्नाला उपस्थित आहे."
9/12
"लग्नासाठी घरी लाडू बनवले आहेत, बरीच जय्यत तयारी केली आहे. आनंदीबाई अजिबात खुश नाहीये की, अधू इंद्रयणीसोबत लग्न करतोय, पण तरी मुलाच्या सुखासाठी सगळं व्यवस्थितरित्या पार पाडलं जातं आहे. लग्नाचं शूट एक आठवडा सुरु आहे, ज्यामध्ये हळद, मेहंदी असे सगळे कार्यक्रम आहेत.", असं अनिता दाते म्हणाली.
10/12
"यात मला सांगावसं वाटेल की, लग्नाचं शूट सुरु होतं आणि कन्यादान शूट होत असताना इंदू म्हणजेच कांचीला रडू कोसळलं तो आमच्यासाठी खुपचं भावुक क्षण होता, आम्ही सगळ्यांनीच तिला आधार दिला. मालिकेत अधूचे पहिले लग्न मोडलं आणि आता इंदुसोबत लग्न होत असल्यानं जो मांडव उभारला होता तो जवळपास 2-3 आठवड्यापासून तसाच आहे.", असं अनिता दाते म्हणाली.
11/12
"खूप पाऊस, हवा यामुळे शूट करणं अवघड गेले, पण आमच्या टीमनं हेही शिवधनुष्य अगदी छान पार पाडलं असं म्हणायला हरकत नाही.", असं अनिता दाते म्हणाली.
12/12
असं म्हणतात सात जन्माच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. आयुष्याच्या जोडीदाराची कुठल्यातरी टप्यावर भेट ही लिहूनच ठेवलेली असते. पण नियतीच्या खेळीत अडकलेले दोन जीव अधू - इंदू एकत्र कसे येणार ? इंदू आणि अधूच्या नात्याला आनंदी मनापासून स्वीकारेल का? या परिस्थितीत अधूची खंबीर साथ इंदूला मिळणार? पुढे काय होणार? हे मालिकेच्या पुढच्या काही भागांत उलगडणार आहे.
Published at : 04 Jun 2025 01:20 PM (IST)