Ibrahim Ali Khan Debut: "याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Ibrahim Ali Khan Debut: सैफ आणि अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खान आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहरनं इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर केली असून त्यासंदर्भात घोषणाही केली आहे.
Ibrahim Ali Khan Debut
1/8
करण जोहरनं सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करून इब्राहिम अली खानच्या लाँचिंगची घोषणा केली आहे. त्यानं इब्राहिमचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.
2/8
करण जोहर सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिम अली खानला लाँच करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. आता या अफवांना पूर्णविराम देत, करणनं स्वतःच त्यासंदर्भात घोषणा केली आहे.
3/8
करणनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यानं सैफ आणि अमृतासोबतच्या भेटीची आठवण करून दिली आहे आणि इब्राहिमला लाँच करण्याबद्दल बोललं आहे.
4/8
करणनं इब्राहिमचे अनेक फोटो शेअर केले आणि लिहिलं, मी अमृता किंवा डिंगी यांन तेव्हा भेटलो, जसे माझे प्रियजन तिला म्हणतात... जेव्हा मी फक्त 12 वर्षांचा होतो. त्यांनी माझ्या वडिलांसोबत धर्मा प्रॉडक्शनसाठी 'दुनिया' नावाचा चित्रपट केला होता आणि त्यांचा सोज्वळपणा, ऊर्जा आणि कॅमेऱ्यावरील प्रभुत्व मला चांगलंच आठवतंय.
5/8
करणनं पुढे लिहिलं की, पण, तिची जी गोष्ट मला सर्वाधिक आठवते, ती म्हणजे, आमच्या पहिल्या भेटीनंतर त्यांच्या आणि त्यांच्या हेअरस्टायलिस्टसोबत केलेलं शानदार चायनिज डिनर, त्यानंतर जेम्स बॉन्डची फिल्म! जेव्हा आम्ही भेटलो, त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत खूप छान टाईम स्पेंड केला, हीच त्यांची पॉवर ऑफ ग्रेस होती. .. जी त्यांच्या आणि त्यांच्या मुलांमार्फत जिवंत आहे.
6/8
सैफबाबत करणनं लिहलं की, सैफशी माझी पहिली भेट आनंद महिंद्राच्या ऑफिसमध्ये झाली होती. यंग, चार्मिंग आणि एफर्टलेस... अगदी तसाच, जसा पहिल्यांदा इब्राहिमशी भेटल्यावर वाटलं. आणि एक निखळ मैत्री जी आमच्या पिढीपासून आमच्या मुलांपर्यंत कायम आहे.
7/8
करणनं पुढे लिहिलं की, मी या कुटुंबाला 40 वर्षांपासून ओळखतो. मी त्यांच्यासोबत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम केलं आहे. अमृतासोबत दुनिया, कल हो ना हो, सैफसोबत कुरबान आणि बेशक, सारासोबत सिम्बा आणि त्यानंतरच्या अनेक भूमिकांमध्ये (ज्या पुढच्या काळात येणार आहेत). मी या कुटुंबाचा एक भाग आहे, मी त्यांना ओळखतो.
8/8
इब्राहिमच्या लाँचची घोषणा करताना करणनं लिहिलं की, चित्रपट त्याच्या रक्तात, त्याच्या जीन्समध्ये आहे आणि त्याला आवडीतं. आम्ही प्रतिभेच्या एका नव्या लाटेसाठी मार्ग मोकळा करतो. तर इब्राहिम अली खान तुमच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करण्यासाठी लवकरच... रुपेरी पडद्यावर...
Published at : 29 Jan 2025 03:10 PM (IST)