घरच्या कुकने माही विजला दिली जीवे मारण्याची धमकी; काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि यशस्वी होस्ट जय भानुशालीच्या (Jay Bhanushali) पत्नीला अर्थात अभिनेत्री माही विजला (Mahi Vij) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.(photo:mahhivij/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी जय भानुशालीच्या घरी एक व्यक्ती काम करत होता, त्यानेच अभिनेत्याची पत्नी माही विजला जीवे मारण्याची धमकी दिली होती. माहीने या घटनेचा व्हिडीओही बनवला आहे. (photo:mahhivij/ig)
माही विजने नुकतेच काही ट्विट केले होते, ज्यामध्ये तिने आपल्याला नोकराकडून धमक्या मिळत असल्याचे सांगितले होते. मात्र, नंतर ते ट्विट माहीने डिलीट केले होते. मात्र, या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.(photo:mahhivij/ig)
या ट्विटमध्ये तिने लिहिले होते की, घरच्या कुकने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माहीने लिहिले की, तिच्याकडे एक व्हिडीओही आहे. माही एका मुलाखतीतही या विषयावर मोकळेपणाने बोलली. तिने सांगितले की, त्यांच्या घरात काही काळ एक व्यक्ती स्वयंपाकी म्हणून काम करत होता. मात्र, या दरम्यान तो चोरी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्याला विचारणा केली असता, तो महिन्याभराचा पगार मागू लागला. त्यावरून ही बाचाबाची इतकी वाढले की, त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.(photo:mahhivij/ig)
माहीने 'ई-टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘या कुकला कामावर घेऊन फक्त तीन दिवस झाले होते. तो चोरी करत असल्याचे आम्हाला समजले. मी जयला ही गोष्ट सांगितले आणि तो आल्यावर त्याने कुकला पैसे देऊन कामावरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पूर्ण महिन्याचा पगार मागायला सुरुवात केली. यावर जयने सवाल केला असता, मी 200 बिहारी आणून त्यांना उभे करीन, अशी धमकी त्याने दिली. तो आम्हाला शिवीगाळ करू लागला. आम्ही पोलिसांकडे गेलो आणि याची रीतसर तक्रारही नोंदवली.’(photo:mahhivij/ig)
अभिनेत्रीने असेही म्हटले की, तिला काही झाले तरी त्याची तिला पर्वा नाही. परंतु, ती तिला तिच्या मुलीची चिंता वाटते. माही पुढे म्हणाली की, ‘जेव्हा आम्ही पोलिस स्टेशनला गेलो, तेव्हा तो मला सतत फोन करत होता. माझ्याकडे सर्व रेकॉर्डिंग आहेत. त्याने खरंच मला जीवे मारले तर? मला काही झाले तर, लोक नंतर त्याचा निषेध करतील. त्याने काय होईल? मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती वाटते. तो सध्या जामिनावर बाहेर आल्याचे मी ऐकले आहे. त्याने ज्या प्रकारे धमकावले आहे, ते प्रत्यक्षात केले तर? सध्या माहीला तिच्या कुटुंबाची काळजी वाटत आहे.(photo:mahhivij/ig)