Hiramandi Season 2 Hype : ‘हीरामंडी 2’ जोरात तयारीत भन्साळींच्या नव्या सीझनकडून प्रेक्षकांची मोठी अपेक्षा!
Hiramandi Season 2 Hype : संजय लीला भन्साळींच्या हिट नेटफ्लिक्स सीरिज ‘हीरामंडी’च्या दुसऱ्या भागाचे लेखन जोरात सुरू असून नवीन कथा-पात्रांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Continues below advertisement
Hiramandi Season 2 Hype
Continues below advertisement
1/8
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'हीरामंडी' या सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं.त्यांचं ओटीटीवरील पहिलं पदार्पण प्रेक्षकांमध्ये आणि उद्योगविश्वात मोठा चर्चेचा विषय ठरला.
2/8
भव्य सेट्स, दमदार कथा आणि प्रभावी अभिनयामुळे ही सीरिज ओटीटीवर चर्चेचा मुख्य विषय ठरली.
3/8
हीरामंडीचा पहिला सीझन हिट झाल्यापासूनच प्रेक्षक हिरामंडी भाग 2 च्या सीरिजची उत्सुकतेने वाट पाहत होते.
4/8
लेखक विभू पुरी यांनी मुलाखतीत सांगितलं की ‘हीरामंडी 2’ च्या कथानकाचं लेखन सध्या जोरात आणि सक्रियपणे सुरू आहे.
5/8
ते नवीन पात्रांची माहिती, त्यांच्या कथा आणि पुढील घडामोडी कशा असतील यावर काम करत आहेत.
Continues below advertisement
6/8
भन्साळीही हा सीझन तरुण प्रेक्षकांना अधिक चांगला समजेल आणि आवडेल यासाठी काळजीपूर्वक तयारी करतायत.
7/8
पहिल्या सीझनमध्ये मनीषा कोयराला, रिचा चड्डा, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी आणि शेफाली शाह यांसारखे मोठे कलाकार झळकले होते.
8/8
आता दुसऱ्या सीझनचा अपडेट मिळाल्याने चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह आणि अपेक्षा वाढल्या आहेत.
Published at : 15 Nov 2025 03:38 PM (IST)