Hema Malini : हेमा मालिनींनी केला बॅले डान्स; पाहा फोटो
बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनी सध्या चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहेमा मालिनी यांनी आपल्या सौंदर्य, नृत्य आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
आता नुकतचं हेमा मालिनी यांनी गंगा नदीवर आधारित असलेला एक बॅले डान्स म्हणजेच नृत्यनाटिका सादर करत सर्वांना थक्क केलं आहे.
आपल्या मातृभूमीचा गौरव साजरा करण्यासाठी अभिनेत्री आणि नर्तिका हेमा मालिनी यांनी 'गंगा' ही नृत्यनाटिका सादर केली.
'गंगा' ही नृत्यनाटिका सादर करताना हेमा मालिनी यांनी पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
हवेत तरंगत एरियल प्रकारे त्यांनी हा बॅले डान्स सादर केला.
हेमा मालिनी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी बॅले डान्स करत प्रेक्षकांना वेड लावलं.
हेमा मालिनी यांचे बॅले डान्स करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'गंगा' नृत्यनाटिकेबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या,या नृत्याच्या माध्यमातून पर्यावरणासंदर्भात एक महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हेमा मालिनी यांचा बॅले डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.