एक गाव, 7 मर्डर अन् 6 एपिसोड... सिनेमाच्या पहिल्या सेंकंदापासून गोंधळ उडतो, क्लायमॅक्स पाहून तर तोंडचं पाणीच पळेल

वेगळ्या धाटणीची ही वेब सीरिज सस्पेन्सनं भरलेली आहे. साऊथची असली तरीसुद्धा तुम्ही ही वेब सीरिज हिंदीमध्येही पाहू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता श्रीकांत आणि राजेंद्र प्रसाद यांची ही वेब सीरिज 'हरिकथा' ओटीटीवर प्रचंड गाजली आहे. या वेब सीरिजमध्ये एकूण 6 एपिसोड्स आहेत आणि सर्वच्या सर्व एपिसोड जबरदस्त आहेत.

जर तुम्ही पहिला एपिसोड पाहण्यासाठी सुरूवात केली, तर गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही शेवटच्या एपिसोडपर्यंत जागेवरून उठणार नाही. एवढा सस्पेंन्स यामध्ये भरला आहे.
वेब सीरिजची कथा सस्पेन्सने भरलेली आहे. तुम्ही हॉटस्टारवर ही साऊथची वेब सिरीज हिंदीमध्ये देखील पाहू शकता. मालिकेची कथा एका गावातून सुरू होते, जिथे एकामागून एक 7 खून होतात.
गावात ज्यांची हत्या होते, ते सर्व गुंड असतात. हरिकथेत संगितल्यानुसार सर्वच्या सर्व खून होतात, म्हणून गावकऱ्यांचा असा समज होतो की, देवाचा कोप झाला असून हे सर्व खून देव करतोय, देव वाईट आणि राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा देण्यासाठी हे सर्व करत आहे.
दोनदा तर गावातील दोघेजण या खूनांचे साक्षीदार होतात, त्यापैकी एक पोलीस असतो. या काळात एकाला भगवान विष्णूचा पाचवा अवतार असणाऱ्या भगवान नरसिंहाचं दर्शन होतं.
तर, एक पोलिसवाला भगवान कृष्णाला पाहतो. तसेच, पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असलेल्या श्रीकांतला सर्व गोष्टी विचित्र वाटतात. तो या गावचा नाही, पण त्याच्या मित्राला भेटण्यासाठी या गावात येतो आणि त्याच्या मित्राचीही हत्या होते.
मित्राच्या हत्येनंतर तो सातत्यानं होणाऱ्या या हत्यांचं कारण शोधण्यासाठी निघतो. त्यानंतर त्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, सर्वच्या सर्व खून नाटक पाहून परतल्यानंतरच होत आहेत. त्याला नाटक कंपनीच्या प्रमुखावर संशय येतो. त्यानंतर तो त्याची चौकशी करायला जातो.
पुढे जे होतं, ते पाहून तुमच्या पायाखालची जमिन हादरून जाईल. या वेब सीरिजचे सर्वच्या सर्व एपिसोड्स पाहावे लागतील. सस्पेन्सनं भरलेली ही वेब सीरिज पाहिल्यावर तुम्ही नक्कीच चक्रावून जाल.
अनेकांनी ही वेब सीरिज पाहिल्यानंतर आजवरची ही सर्वात धोकादायक वेब सीरिज असल्याचं म्हटलं आहे.