hardik natasha divorce : हार्दिक पांड्याच नव्हे तर 'या' दिग्गज खेळाडूंचाही झालाय घटस्फोट!

hardik natasha divorce : हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानंतर आता क्रिकेट जगतातील घटस्फोट घेतलेल्या इतर खेळाडूंचीही चर्चा होत आहे.

नुकताच हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक क्रिकेटपटूंच्या बाबतही असा प्रसंग आल्याचं पाहायला मिळतं, जाणून घेऊया कोणकोणत्या खेळाडूंच्या बाबत असं घडलं आहे

1/9
हार्दिक पांड्याआधी भारतीय क्रिकेट विश्वात मोठं नाव कमवणाऱ्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. (P.C. hardikpandya93)
2/9
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि मॉडेल,अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून अधिकृतपणे तशी घोषणा केली आहे. (P.C. hardikpandya93)
3/9
हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानंतर आता क्रिकेट जगतातील घटस्फोट घेतलेल्या इतर खेळाडूंचीही चर्चा होत आहे. (P.C. hardikpandya93)
4/9
शिखर धवन हा मैदानावर उतरल्यानंतर चौकार आणि षटकार यांचा पाऊस पाडतो.वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याला कठीण काळातून जावं लागलं. (p.c shikhardofficial)
5/9
शिखरने 2009 साली मेलबर्नमध्ये आयशा मुखर्जीसोबत साखरपुडा केला होता.त्यानंतर 2012 साली या जोडीने लग्न केलं.शिखर आणि आयशा यांना एक मुलगा आहे. शिखर आणि आयशा यांनी 11 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.2023 साली शिखरने आयशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतला.(p.c shikhardofficial)
6/9
दिनेश कार्तिकने 21 वर्षाचा असताना 2007 साली लहानपणीची मैत्रीण निकिता बंजारा हिच्यासोबत लग्न केलं होतं.2012 साली दिनेश कार्तिक आणि निकिता बंजारा विभक्त झाले.2015 साली दिनेश कार्तिकने स्वॅशपटू दीपिका पल्लीकलसोबत लग्न केलं.(p.c dk00019)
7/9
2018 साली हसीन जहाँने मोहम्मद शमीवर विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसेचे आरोप केले.तेव्हापासून हे दोघेही एकमेकांपासून वेगळे राहू लागले. सध्या दोघांमधील हा वाद न्यायलयात प्रलंबित आहे.या दोघांना एक मुलगी आहे.(P.C mdshami.11)
8/9
भारताचा प्रसिध्द अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि मॉडेल,अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांनीही नुकतंच विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. (P.C. hardikpandya93)
9/9
हार्दिक नताशा यांनी 1 जानेवारी 2020 रोजी लग्न केले.त्यानंतर त्यांनी 2023 साली पुन्हा एकदा मोठ्या थाटामाटात लग्न केलं. मात्र अलिकडेच या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात होतं. (P.C. hardikpandya93)
Sponsored Links by Taboola