Happy Birthday Siddhant Chaturvedi : सीएची परीक्षा पास झाला, मात्र ‘गली बॉय’ने करिअरची दिशाच बदलली! जाणून घ्या सिद्धांत चतुर्वेदीबद्दल..
Siddhant Chaturvedi
1/6
‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आज (29 एप्रिल) आपला 29वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/6
‘गली बॉय’, ‘गेहरांईया’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील सिद्धांत चतुर्वेदीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
3/6
कोणत्याही व्यक्तिरेखेत इतक्या सहजतेने फिट होणाऱ्या सिद्धांत चतुर्वेदीला अभिनेता होण्याआधी काहीतरी वेगळे व्हायचे होते.
4/6
अभिनय हेच त्याचं पहिलं प्रेम आहे. पण, सिद्धांत अभ्यासातही प्रचंड हुशार होता. अभिनेता होण्यापूर्वी त्याने सीएच्या परीक्षेची तयारी केली होती आणि त्याने सीएची परीक्षा देखील क्लीअर केली होती.
5/6
मात्र, अभिनयाकडेचं त्याचं मन धाव घेत होतं. यानंतर त्याने मनोरंजन विश्वाकडे वळण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच चित्रपटाने अर्थात ‘गली बॉय’ने त्याच्या फिल्मी करिअरला कलाटणी दिली.
6/6
'गली बॉय'मध्ये रणवीर सिंहसारख्या अभिनेता मुख्य भूमिकेत असूनही, सिद्धांत चतुर्वेदी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चर्चेत राहिला होता. यानंतर त्याच्याकडे नवीन चित्रपटांची रांगच लागली. (Photo : @siddhantchaturvedi/IG)
Published at : 29 Apr 2022 10:33 AM (IST)