Happy Birthday Shriya Pilgaonkar : ‘एकुलती एक, लाडाची लेक’, अभिनेत्री श्रिया पिळगांवकरबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Shriya Pilgaonkar

1/7
मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध जोडी सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिचा आज (25 एप्रिल) वाढदिवस आहे.
2/7
स्टारकिड असली तरी, श्रिया पिळगांवकर स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आज इथवर पोहोचली आहे. तिने तिच्या करिअरमध्ये प्रचंड मेहनतीने काम मिळवले आहे.
3/7
लहानपणी, श्रियाने व्यावसायिक जलतरणपटू बनण्याचे प्रशिक्षण घेतले आणि शाळेत अनेक पदके जिंकली होती. ती कथ्थकमध्येही पारंगत आहे.
4/7
मोठी झाल्यावर तिने ‘भाषाशास्त्रज्ञ’ होण्याचा विचार केला आणि म्हणून जपानी भाषा देखील ती शिकली. श्रियाने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्रात पदवी पूर्ण केली आहे.
5/7
तिने वयाच्या पाचव्या वर्षी टेलिव्हिजनवर पहिल्यांदा ‘तू तू मैं मैं’ या हिंदी मालिकेत ‘बिट्टू’ नावाची भूमिका साकारली होती. इथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली होती.
6/7
श्रियाने 2013 मध्ये दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात सचिन आणि सुप्रियाच तिचे आई-वडील म्हणून दाखवण्यात आले होते.
7/7
मराठी चित्रपटच नाही, तर तिने फ्रेंच आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. शाहरुख खानसोबत ती ‘फॅन’ या चित्रपटात झळकली होती. याशिवाय ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजमधील तिची भूमिकाही प्रचंड गाजली होती. (Photo : @shriya.pilgaonkar/IG)
Sponsored Links by Taboola