Happy Birthday Priya Marathe : मराठीच नव्हे तर हिंदी मालिकेतही उमटवला अभिनयाचा ठसा! अभिनेत्री प्रिया मराठेबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Priya Marathe

1/6
अभिनेत्री प्रिया मराठे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक चर्चित नाव आहे. प्रियाने अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
2/6
आज (23 एप्रिल) अबिनेत्री प्रिया मराठे आपला वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
3/6
‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ या मराठी, तर ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कॉमेडी सर्कस’ या हिंदी मालिकांमध्येही प्रियाने कायम आठवणीत राहतील अशा भूमिका केल्या आहेत.
4/6
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावणाऱ्या अभिनेते शंतनू मोघे यांच्याशी प्रियाने लग्नगाठ बांधली आहे. मैत्रीपासून सुरु झालेलं हे नातं 2012मध्ये लग्नात रुपांतरीत झालं.
5/6
प्रिया मराठे केवळ अभिनेत्रीच नाही, तर उद्योजिका देखील आहे. अभिनेत्रीने स्वतःचा एक कॅफे देखील सुरु केला आहे. अभिनयासोबतच ती हा व्यवसाय देखील सांभाळते.
6/6
मालिका, चित्रपटच नव्हे तर, प्रिया नाटकांमध्ये देखील सक्रिय आहे. ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. (Photo : @priyamarathe/IG)
Sponsored Links by Taboola