Happy Birthday Kartik Aaryan: ग्वाल्हेरसारख्या छोट्या शहरात जन्मलेल्या कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये कसा धमाका केला, जाणून घ्या संपूर्ण कथा
Continues below advertisement
kartik aryan
Continues below advertisement
1/6
Happy Birthday Kartik Aryan: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने खूप वेगाने प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारखे हिट चित्रपट दिल्यानंतर, भरमसाठ फी घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत कार्तिकचा समावेश होतो. सध्या कार्तिक आर्यन धमाका या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्याने छोट्याशा जागेतून बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत स्वत:चे नाव कसे कमावले हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (photo:kartikaaryan/ig)
2/6
काही काळापूर्वी कार्तिकची बॉलिवूडमध्ये एन्ट्री कशी झाली याबद्दल अभिनेत्याने ब्लॉगद्वारे सांगितले होते. बॉलीवूडच्या किंग खानचा चित्रपट पाहून खूप प्रेरित झाल्याचेही त्याने सांगितले. या सर्व गोष्टींचा खुलासा कार्तिकने 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' या सोशल मीडिया ब्लॉगमध्ये केला आहे. या ब्लॉगमध्ये त्याला स्टुडिओतूनच बाहेर कसे पाठवण्यात आले हेही सांगितले आहे. (photo:kartikaaryan/ig)
3/6
चित्रपटात येण्यापूर्वीच्या दिवसांचा उल्लेख करताना कार्तिक आर्यन म्हणतो की, त्याचा जन्म ग्वाल्हेर या छोट्याशा गावात झाला. कार्तिकचे आई-वडील मेडिकल लाइनशी जोडले गेले होते आणि तो स्वतः इंजिनीअरिंग करणार होता.(photo:kartikaaryan/ig)
4/6
कार्तिक म्हणाला, 'मी नववीत होतो. त्यावेळी मी शाहरुख खानचा बाजीगर हा चित्रपट पाहिला. मला माहीत होतं की मी पडद्यावर चांगली कामगिरी करू शकतो. मी बारावीपर्यंत ग्वाल्हेरमध्ये शिकलो आणि त्यानंतर सुदैवाने मला नवी मुंबईत कॉलेज मिळाले. मी तिथे हॉस्टेलमध्ये राहायचो आणि तिथून ऑडिशनला जायचो. ६-६ तासांचा प्रवास करूनही अनेकवेळा मला स्टुडिओच्या गेटवरूनच परत पाठवण्यात आले. तरीही, यामुळे माझ्या आशा संपल्या नाहीत.(photo:kartikaaryan/ig)
5/6
कार्तिक पुढे सांगतो, 'लवकरच मला छोट्या-छोट्या एड्स मिळू लागल्या. माझ्याकडे इतके पैसेही नव्हते की मी माझे फोटोशूट करू शकेन. एकदा चित्रपटाच्या ऑडिशनची जाहिरात पाहिली आणि तिथे जाण्याचा विचार आला. ऑडिशनमध्ये त्यांना मी आवडलो आणि त्यामुळे मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.(photo:kartikaaryan/ig)
Continues below advertisement
6/6
अभिनेता पुढे सांगतो, “काही वेळेत बरेच काही बदलले आहे. सोनू के टीटू की स्वीटीनंतर जणू माझं जगच बदलून गेलं होतं.(photo:kartikaaryan/ig)
Published at : 22 Nov 2021 04:22 PM (IST)