In Pics : 'सौदामिनी कुंकू लाव....', कायमच ट्रेंडमध्ये असणारे अशोक सराफ यांच्या चित्रपटातील डायलॉग्सचे अफलातून मीम्स
मराठी आणि हिंदी कलाविश्वात, सोबतच रंगभूमीवरही अधिराज्य गाजवणारं आणि प्रेक्षकांच्या मनात, त्यांच्या घरातही कायमचं स्थान मिळवलेलं एक नाव म्हणजे अशोक सराफ. सर्वांसाठी हक्काचं, प्रेमाचं आणि आपलं माणूस म्हणजे अशोक मामा. त्यांच्या बहुसंख्य चित्रपटातील संवाद, दृश्य आजही तितकीच लोकप्रिय. शिवाय वख्या, विख्खी वुख्खू म्हणण्याच्या त्यांचा अंदाज म्हणजे काही औरच. सोशल मीडियावर अशोक सराफ यांचे चित्रपट गाजतात ते मीम्समुळंसुद्धा. चला तर मग पाहूया अशोक मामांच्या डायलॉग्सच्या मीम्सचा कधीही न संपणारा ट्रेंड...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशी ही बनवाबनवी या चित्रपटातील प्रत्येक दृश्यावर किमान एक मीम तरी तयारच असेल असं म्हणायला हरकत नाही. (छाया सौजन्य- instagram marathi.mulgi)
अशोक सराफ यांनी धुमधडाका चित्रपटात साकारलेली भूमिका आणि त्यातील प्रत्येक दृश्य, नवकोटनारायण म्हणून आपली ओळख करुन देण्याचा त्यांचा अंदाज म्हणजे क्या बात. (छाया सौजन्य- instagram memebai_merijaan)
प्रत्येक पिढीतील व्यक्ती या मीम्सशी सहमत असतेच. (छाया सौजन्य- instagram marathi.mulgi)
अशोक सराफ यांच्या चित्रपटातील भूमिका आणि त्यातील काही दृश्य अगदी सहजपणे आपल्या मनाचा ठाव घेतात. (छाया सौजन्य- insta marathi.mulgi)
बरं, ते व्याख्या विख्खी वुख्खू आठवतंय का? (छाया सौजन्य- instagram funtashmemes)
'माझा पती करोडपती' या चित्रपटातील, 'सौदामिनी कुंकू लाव', या त्यांच्या वाक्यावरून तर अनेक मीम्स शेअर झाले. (छाया सौजन्य- instagram marathikida)
70 रुपये वारले म्हटलं की अशोक मामांचाच चेहरा समोर येतो. (छाया सौजन्य- instagram wordplayoninsta)
धमाल संवादांना अगदी परिणामकारकपणे सादर करणाऱ्या अशोक मामांच्या चित्रपटातील मीम्स म्हणजे सोशल मीडियावर जणू कधीही न संपणारा एक ट्रेंड (छाया सौजन्य- instagram manoranjan_wede)