In Pics : बहुगुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा आज वाढदिवस
नाटक म्हणू नका किंवा मग मालिका... इतकंच नव्हे, तर अगदी चित्रपटांच्या माध्यमातूनही अभिनेत्री मुक्ता वर्बे हिनं प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिनं साकारलेली प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या मनावर कायमचं नाव कोरणारी.
अशा या स्वच्छंदी आणि हरहुन्नरी अभिनेत्रीचा आज वाढदिवस.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुक्ताला अनेकजण या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
विनोदी, गंभीर आणि अतिशय वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याला मुक्तानं विशेष प्राधान्य दिलं आहे.
चित्रपटांमध्ये ती जितक्या सहजतेनं वावरते तितक्याच सहजतेनं तिनं मालिकेत साकारलेलं पात्रही विशेष दाद देण्याजोगं.
अभिनयाच्या बाबतीत मुक्ता ही तिच्या नावाप्रमाणेच अगदी मुक्त आहे.
कलेच्या बळावर कारकिर्दीत यशशिखरं गाठणाऱ्या या अभिनेत्रीला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
(छाया सौजन्य- instagram @muktabarve)