लष्कराची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं; जाणून घ्या, एका अपघातामुळं कसं आयुष्य पालटलं?
बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे आधी वेगळ्याच फिल्डमध्ये आपलं नशीब आजमावत होते, पण नंतर त्यांनी अभिनयालाच आपलं करियर बनवलं आणि यशस्वी ठरले. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी सैन्यात नोकरी करत होती. पण एका अपघातामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आणि ती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीही बनली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरं तर, आम्ही बोलत आहोत हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये आपल्या अदांनी घायाळ करणारी प्रसिद्ध अभिनेत्री माही गिलबाबत. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी माही गिल लष्करात काम करत होती. माहीनं आर्मीची नोकरी सोडली आणि नंतर तिला पंजाबी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला, त्यानंतर माहीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही.
माहीचा जन्म चंदीगडमधील जमीनदार कुटुंबात झाला होता आणि तिचे आई-वडील दोघेही नोकरदार होते. वडील सरकारी अधिकारी आणि आई कॉलेज लेक्चरर म्हणून काम करत होती. कॉलेजमध्ये असताना माही एनसीसीमध्ये दाखल झाली, ज्यामुळे तिला सैन्यात नोकरी मिळाली. सैन्यात निवड झाल्यानंतर माही बराच काळ लष्कराचा भाग होती.
एका मुलाखतीदरम्यान माही गिलनं लष्कर सोडण्याचं कारणही सांगितलं. माहीनं सांगितलं की, चेन्नईमध्ये पॅरा सेलिंग ट्रेनिंग दरम्यान तिचा अपघात झाला. प्रशिक्षणादरम्यान जेव्हा तिनं पॅरा जंप केला, तेव्हा फ्रीफॉल झाला. या अपघातात माही अगदी मृत्यूच्या दाढेतून परत आली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
माही गिलनं सांगितलं की, या अपघाताची बातमी ऐकून तिचे कुटुंबीय खूप घाबरले आणि त्यामुळे तिला घरी परतावं लागलं. यानंतर माहीनं लष्कराची नोकरी सोडली. अभिनय कारकिर्दीबाबत माही गिलनं सांगितलं की, तिला अभिनयात कधीच रस नव्हता. चित्रपटात काम करण्याचा विचारही त्यांनी केला नव्हता.
माही सांगते की, माझे फायरिंग आणि आर्मीमध्ये कमांड खूप चांगले होते. जर मी सैन्य सोडून अभिनयात रुजू झालो नसतो, तर कदाचित मी सैन्यात चांगल्या पदावर काम करत असते. प्रजासत्ताक दिनीही मला कमांड देण्यासाठी बोलावलं जातं.
आर्मी सोडल्यानंतर माहीनं एका चित्रपट दिग्दर्शकाची भेट घेतली आणि तिला पहिला चित्रपट मिळाला. 2009 मध्ये तिनं अनुराग कश्यपच्या 'देव डी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
यानंतर 'साहेब बीवी और गँगस्टर', 'दबंग' या चित्रपटांशिवाय अनेक वेब सीरिजमध्ये दमदार व्यक्तिरेखाही साकारल्या आहेत.