Godavari Movie : जितेंद्र जोशीचा गोदावरी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत!
गोदावरी सिनेमा येत्या 3 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (Photo:@jitendrajoshi27/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोदावरी सिनेमाचे आंतरराष्ट्रीय समीक्षणदेखील करण्यात आले होते, सिनेमा भारतात प्रदर्शित होण्याआधीच सिनेमाने सातासमुद्रापार मजल मारली आहे. (Photo:@jitendrajoshi27/IG)
त्यानिमित्ताने जितेंद्रने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हटके पोस्टदेखील लिहिली आहे. (Photo:@jitendrajoshi27/IG)
जितेंद्र जोशी ने सोशल मीडियावर सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल लिहिले आहे, तो म्हणालाय..बोर्डाच्या परिक्षेत पहिलं आल्यासारखं वाटतंय. (Photo:@jitendrajoshi27/IG)
जितेंद्रने पुढे लिहिले आहे, गोदावरी पहिला प्रयत्न, पहिला चित्रपट आणि थेट ऑक्करच्या पहिल्या शर्यतीत पोहोचला. 'कूळंगल' सिनेमाचे अभिनंदन तसेच गोदावरीच्या संपूर्ण संघाचं अभिनंदन. (Photo:@jitendrajoshi27/IG)
जितेंद्रच्या या पोस्टवर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारदेखील जितेंद्रचे कौतुक करताना दिसून येत आहे. (Photo:@jitendrajoshi27/IG)
मराठीतीत एक उत्तम अभिनेता जितेंद्र जोशी आतापर्यंत नाटक, सिनेमा, मालिका, वेब मालिकांमध्ये अभिनय करताना दिसून आला आहे. तर तो उत्तम लेखक देखील आहे.