Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: ट्विटरवर ट्रेंड होणारी ही सुंदरी, अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक आहे. सध्या ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत असलेलं हे नाव आहे.
Continues below advertisement
Girija oak internet sensation viral photo
Continues below advertisement
1/9
ट्विटरवर ट्रेंड होणारी ही सुंदरी, अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक आहे. सध्या ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत असलेलं हे नाव आहे.
2/9
मालिका, चित्रपट, नाटक आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेली अभिनेत्री गिरिजा ओक ही "न्यू नॅशनल क्रश" होताना दिसतेय, सध्या तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
3/9
एका हिंदी युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतील तिचे निळ्या साडीतील आणि स्लिव्हेज ब्लाऊजमधील हे फोटो असून तीचं निखळ, निर्मळ सौंदर्य नेटीझन्सला भावलं आहे.
4/9
ट्विटरवर अनेकांनी गिरीजा ओकचे निळ्या साडीतील हे फोटो शेअर कौन हे यह? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, अनेकांनी तिचे फोटो पाहून दाक्षिणात्या सिनेसृष्टीतही झाकून बघितलयं.
5/9
इंटरनेटवर, ट्विटरवर ग्रोकलाही हे फोटो शेअर करत प्रश्नांचा भडिमार करण्यात आलाय. या पोस्टला ट्विटवर लाखो व्ह्यूज मिळत असून विविध अकाऊंटवरुन हा फोटो व्हायरल झाला आहे.
Continues below advertisement
6/9
गिरीजा ओक असं या अभिनेत्रीचं नाव असल्याचे समजल्यानंतरही नेटीझन्सने इंस्टाग्राम अकाऊंवर जाऊन, गुगलवर सर्च करुन तीची माहिती जाणून घेतली.
7/9
अभिनेत्री गिरीजा ओकने मराठी, हिंदी, कन्नड सिनेमांसह मालिकांमध्येही काम केलं आहे. आमीर खानच्या तारे जमीन पर आणि शोर इन द सिटी चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या आहेत.
8/9
गिरीजा ओकचा जन्म 17 डिसेंबर 1987 रोजी नागपूर येथे झाला, तर 2011 साली तिचे लग्न सुहरुद गोडबोले यांच्याशी झाले असून सध्या सिनेसृष्टीत ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
9/9
प्रामुख्याने मराठमोळी असलेली गिरीजा ओक मराठी मालिकांमध्ये सहसा दिसून येते, मात्र तीने एका हिंदी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीनंतर तिचा हा फोटो व्हायरल होत आहे
Published at : 11 Nov 2025 08:51 PM (IST)