Makar Sankrant : यंदाच्या संक्रांतीसाठी घ्या इन्स्पिरेशन; पाहा सुमेधा दातारचं संक्रांत स्पेशल फोटोशूट!
नवीन वर्षात (New Year) येणारा पहिलाच आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankranti).
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंक्रांती निमित्त अनेक सस्त्रिया काळी साडी नेसून फोटोशूट करतात.
नुकत्याच एका अभिनेत्रीने देखील काळ्या साडीत फोटोशूट केलं आहे.
काळी साडी, हलव्याचे वेगवेगळे दागिने असा लूक करून तिने हे स्पेशल मकर संक्रांतीचं फोटोशूट शेअर केलंय.
तुम्ही ओळखलंच असेल ही अभिनेत्री ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून आपल्या समोर येते.
‘शालन निंबाळकर’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री सुमेधा दातार या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
हलव्याचे दागिने या अभिनेत्रीवर फारच खुलून दिसत आहे.
या फोटोशूटसाठी सुमेधाने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.
यंदा मकर संक्रातीचा सण १४ जानेवारी २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
तुम्हीही यंदाच्या संक्रांतीसाठी हा लूक फॉलो करू शकता.