Gautami Patil : गौतमी पाटीलने लग्नाबद्दल सोडलं मौन

Gautami Patil : एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

Continues below advertisement

Gautami Patil

Continues below advertisement
1/10
नृत्यांगणा गौतमी पाटीलने महाराष्ट्रभर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
2/10
महाराष्ट्रभर गौतमीचा मोठा चाहतावर्ग असून तिच्या लावणी कार्यक्रमाला चाहते मोठी गर्दी करत असतात.
3/10
गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या.
4/10
आता एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.
5/10
गौतमी म्हणाली की,"अजून तरी मी लग्नाचा विचार केलेला नाही. पण जेव्हा लग्न ठरेल, तेव्हा मी तुम्हाला सर्वांना आवर्जुन सांगेन. सर्वांना पत्रिकाही देईन".
Continues below advertisement
6/10
गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना गौतमी म्हणाली होती,"तुम्ही लग्नाला या आणि तिथेही गोंधळ घालून जा".
7/10
गौतमी गेल्या काही दिवसांपासून लग्नाबद्दल भाष्य करत असल्याने ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
8/10
तरुणांमध्ये गौतमीच्या डान्सची चांगलीच क्रेझ आहे.
9/10
गौतमी पाटील आपल्या डान्समध्ये अश्लील हावभाव करत असल्याने तिच्यावर प्रचंड टीका होते.
10/10
गौतमीने आपल्या अदाकारीने सर्वांना वेड लावलं आहे.
Sponsored Links by Taboola