हर हर महादेव, पहिला श्रावणी सोमवार, गौतमी पाटीलने घेतलं महादेवाचं दर्शन, पाहा फोटो

Gautami Patil : पहिल्या श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने नृत्यांगणा गौतमी पाटील हिने महादेवाचं दर्शन घेतलंय.

Gautami Patil

1/6
नृत्यांगणा गौतमी पाटील हिने पहिल्या श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने महादेवाचे दर्शन घेतले आहेत. यावेळीचे फोटो गौतमी पाटील हिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना गौतमीने "🕉️" असं कॅप्शन दिलं आहे. गौतमी पाटीलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी ओम नम: शिवाय असं म्हणत प्रतिसाद दिला आहे.
2/6
हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते. पावसाळ्याच्या या महिन्यात वातावरण शुद्ध व आल्हाददायक असते. भक्तीभाव मनात जागृत होतो. विशेषतः सोमवारी महादेवाची उपासना केली जाते आणि यामध्ये पहिला श्रावणी सोमवार अत्यंत शुभ व महत्वाचा मानला जातो.
3/6
श्रावणातील प्रत्येक सोमवार शिवभक्तांसाठी पवित्र मानला जातो, पहिला सोमवार म्हणजे या भक्तीच्या पर्वाची सुरुवात. या दिवशी महादेवाच्या मंदिरांमध्ये आणि घरोघरी शिव पूजन, अभिषेक, रुद्राभिषेक, मंत्रोच्चार याचे आयोजन केले जाते. भाविक उपवास करतात आणि संध्याकाळी महादेवाची आरती करतात. अनेक भक्त या दिवशी कावड यात्रेतही भाग घेतात.
4/6
पहिल्या श्रावणी सोमवारला उपवास करण्याची प्रथा आहे. काहीजण फक्त पाणी किंवा फळाहार घेतात तर काहीजण एकदाच अन्न ग्रहण करतात. या दिवशी शिवलिंगावर दूध, पाणी, बेलपान, धतूरा, भस्म, फुलं अर्पण केली जातात. "ॐ नमः शिवाय" हा पंचाक्षरी मंत्र सतत जपला जातो.
5/6
श्रावण सोमवार म्हणजे फक्त पूजाअर्चा नव्हे तर आध्यात्मिक शुद्धीचा एक प्रवास आहे. हे व्रत भक्तांच्या मनात शिस्त, संयम आणि भक्ती या गुणांचे बळ देते. याशिवाय, या निमित्ताने अनेक मंदिरांत भोजनदान, रक्तदान शिबिरे, गरजूंसाठी मदतीचे उपक्रम राबवले जातात.
6/6
पहिला श्रावणी सोमवार हा श्रद्धा, भक्ती आणि भक्ताच्या मनातील सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे. भगवान शिवाचे स्मरण करून आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात, जीवनात शांती आणि समाधान लाभावे, हीच या पर्वामागची भावना असते.
Sponsored Links by Taboola