IN PICS | ‘Kai Po Che’ ते ‘Chhichhore सुशांतचे कायम लक्षात राहणारे टॉप फाईव्ह चित्रपट
अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनावर संपूर्ण देश शोकाकुल झाला. सुशांतने बॉलिवूडमध्ये अल्पावधीत नाव कमावले होते. सुशांतच्या जाण्यानं बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी नक्कीच निर्माण झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (M.S. Dhoni: The Untold Story) या सिनेमात सुशांतनं हूबेहूब धोनी पडद्यावर आणला. आजही लोकांच्या कायम धोनी म्हणून तो लक्षात आहे. धोनीचा प्रवास मांडण्यासाठी त्यानं विशेष प्रशिक्षणही घेतलं होतं. (Film Image, taken from website)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला 'सोनचिडिया' (Sonchiriya) हा चित्रपट आहे. 1975 च्या आणीबाणीनंतर चंबळमधील दरोडेखोऱ्याचं आयुष्य कसं बदलतं याबद्दल भाष्य करणारा हा चित्रपट आहे. (Pic Credit: @taran_adarsh/Twitter)
बॉलीवूडचा युवा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 'काय पो छे' (Kai Po Che) या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला होता. या चित्रपटात सुशांत एक क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिका निभावली होती. (Pic Credit: @itsamittrivedi/Instagram)
यशराज फिल्म्ससोबत ‘डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी’(Detective Byomkesh Bakshy) हा चित्रपट केला. ब्योमकेश बक्षी हे व्यक्तिरेखा सुशांतने छान निभावली होती. 1940 च्या काळातली या सिनेमाची कथा होती. दिवाकर बॅनर्जीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. (Pic Credit: @yrf/Twitter)
सुशात सिंह राजपूत यानं 'छिछोरे' (Chhichhore) हा अखेरचा चित्रपट केला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत चित्रपट हा चित्रपट होते. (Pic Credit: @taran_adarsh/Twitter)