तमन्ना भाटिया ते अक्षय कुमार; बॉलिवूड सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क
Maharashtra Civic Polls 2026: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. बॉलिवूड कलाकार आणि क्रीडापटूंनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली.
Continues below advertisement
Maharashtra Civic Polls 2026
Continues below advertisement
1/17
Maharashtra Civic Polls 2026: आज महाराष्ट्रातील एकूण 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सामान्य व्यक्तींसह सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला. मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचेच लक्ष आहे. अशातच मुंबईतील काही सेलिब्रिटींनी सकाळपासून मतदान करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर हजेरी लावली. सर्वात आधी मतदान करणाऱ्यांमध्ये ट्विंकल खन्ना, अक्षय कुमार आणि सान्या मल्होत्रा या अभिनेत्यांचा समावेश होता.
2/17
अभिनेत्री तमन्ना भाटियाने सकाळीच मुंबईतील मतदान केंद्रावर तिच्या प्रतिनिधीला मत दिले.
3/17
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनीने मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी यावेळेस मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले.
4/17
दादर येथील बालमोहन विद्यामंदिर येथे नाना पाटेकर यांनी मतदान केले.
5/17
आमिर खानच्या कुटुंबाने देखील मतदानाचा हक्क बजावला. आमिर खानची मुले आणि त्याची एक्स पत्नी रिना दत्ताने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
Continues below advertisement
6/17
अभिनेत्री सान्या मल्होत्राने सकाळीच मतदान करून लोकशाहीचा हक्का बजावला.
7/17
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार दोघांनीही सकाळीच मतदान केले. तसेच दोघांनी मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
8/17
अभिनेता जॉन अब्राहम, चित्रपट निर्माती झोया अख्तर, अभिनेत्री दिव्या दत्ता यांनी मुंबईतील विविध मतदान केंद्रावर मतदान केले.
9/17
सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकरसह गुरूवारी सकाळी वांद्रे पश्चिम येथे मतदान केले.
10/17
अभिनेता सुनील शेट्टी याने देखील मतदानाचा हक्क बजावला. तसेच ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनीही मतदान करून लोकशाहीप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
11/17
मुंबईत अभिनेत्री करिना कपूरने बजावला मतदानाचा हक्क. मतदान केंद्रात जातानाचा व्हिडिओ व्हायरल.
12/17
मतदान करण्यासाठी अभिनेत्री महिमा चौधरी मतदान केंद्राबाहेर सज्ज. बजावला मतदानाचा हक्क.
13/17
मतदान करण्यासाठी जुहू मतदान केंद्राबाहेर पोहोचली श्रद्धा कपूर.
14/17
अभिनेत्री भाग्यश्रीने आपल्या कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क.
15/17
जमनाबाई शाळेत जाऊन अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या परिवारासह मतदान केले.
16/17
प्रसिद्ध बॉलिवूड पटकथा लेखक सलीम खान यांनी सकाळीच मतदान करून आपली जबाबदारी पार पाडली.
17/17
अभिनेता सलमान खानने सायंकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी तो मतदान केंद्राबाहेर स्पॉट झाला.
Published at : 15 Jan 2026 11:13 AM (IST)