Smriti Khanna: स्मृतीसाठी तिच्या मातृत्वाचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता; जाणून घ्या!
'मेरी आशिकी तुम से ही' (Meri Aashiqui Tum Se Hi) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री स्मृती खन्ना (Smriti Khanna) ही दुसऱ्यांदा आई होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतच तिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन याविषयी माहिती दिली. आम्ही तिघांचे 4 होणार असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पण स्मृतीसाठी तिच्या मातृत्वाचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. गर्भपात, प्रेग्नंसीदरम्यान रक्तस्राव यांसारख्या अनेक अडचणींचा सामना स्मृतीने यावेळी केला.
स्मृतीने तिच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये या सगळ्याविषयी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे तिने तिच्या गर्भपाताच्या वेदना देखील शेअर केल्या आहेत.
सध्या ही अभिनेत्री दुसऱ्यांदा तिच्या मातृत्वाचा प्रवास अनुभवत आहे. त्यानिमित्ताने तिने तिच्या चॅनलवरुन एक ब्लॉग शेअर केला आहे. त्यामध्ये तिने याबाबत खुलासा केला असल्याचं समोर आलं आहे.
स्मृतीने सांगितले की, तिने दुसऱ्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय तिची मुलगी अनयकासाठी घेतला. तिला भाऊ किंवा बहिण देण्याचा निर्णय तिने यावेळी घेतला आहे. पुढे तिने म्हटलं की,'अनायका नंतर दुसऱ्या मुलासाठी आम्हाला कमी अंतर हवे होते. आम्ही प्रयत्न करत राहिलो पण ते शक्य झालं नाही.
माझी पहिली प्रेग्नंसी खूप चांगली गेली. सर्व काही सुरळीतपणे घडले. दुसऱ्याच्या वेळीही मला हाच विचार आला आणि अनायका दीड वर्षाचा असताना मी दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न केला. मी तेव्हा गरोदर राहिले पण माझा गर्भपात झाला.
कदाचित तेव्हा मानसिक कारणही असू शकते कारण तेव्हा माझी आई कर्करोगावर उपचार घेत होती. तिच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी माझा गर्भपात झाला. तो काळ खूप कठीण होता.यातून बाहेर पडण्यासाठी मला वेळ लागेल, असे गौतम म्हणाला. साधारण वर्षभरानंतर पुन्हा गरोदर राहिले, पण त्यासाठी मी IVF ची मदत घेतली होती.'
IVF फेल झाल्यानंतर स्मृतीने पुन्हा याबाबत निर्णय घेतला. पण यावेळेसही तिला काही अडचणी आल्या. जेव्हा ती प्रेग्नंट राहिली त्यावेळी तिला काही टेस्ट करण्यास सांगितल्या.तेव्हा कळलं की तिला ऑटोम्युन डिसऑर्डर आहे. ज्याबद्दल तिने कधीच ऐकले नव्हते आणि त्यावर उपचार घेणंही शक्य नव्हतं.
त्यामुळे जीवनशैलीत बरेच बदल झाले. 'तुम्हाला ऑटोइम्यून आजार असल्यास आणि तुम्ही गर्भवती असाल, तर सर्वप्रथम तुमच्या गर्भाशयावर परिणाम होतो. हाशिमोटोचा तुमच्या थायरॉईडवर परिणाम होतो. म्हणून मी औषधे, स्टिरॉइड्स आणि बरंच काही सध्या घेतेय, असंही स्मृतीने यावेळी सांगितलं. (all photo:smriti_khanna/ig)