In Pics | 25 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत, जाणून घ्या बी- टाऊन सेलिब्रिटींचा पहिला पगार
1/10
साहसी दृश्यांचा भरणा असणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शत रोहित शेट्टी सुरुवातीला निर्माता कुकू कोहली यांच्याकडे काम करत होता. तिथं त्याला दर दिवशी किमान 35 रुपये मिळायचे असं म्हटलं जातं.
2/10
संजय लीला भन्साळी यांची सहायक म्हणून काम करणाऱ्या सोनम कपूरला पहिला पगार म्हणून 3 हजार रुपये मिळाले होते.
3/10
बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळख असणाऱ्या हृतिक रोशन याने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यासाठी त्याला 100 रुपये इतकं पहिलं मानधन मिळालं होतं.
4/10
अभिनय विश्वावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते इरफान खान यांनी अभिनयाच्या जगतात नावलौकिक मिळवण्यापूर्वी ते एक शिक्षक होते असं म्हटलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांना 25 रुपये मिळत असत.
5/10
जगभरातील कलाविश्वात ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पहिला पगार होता 5 हजार रुपये.
6/10
अभिनेता आमिर खान यानंही सुरुवातीच्या दिवसांमध्ये सहायक दिग्दर्शनाचं काम केलं. ज्यासाठी त्याला 1 हजार रुपये इतका पहिला पगार मिळाला होता.
7/10
धर्मेंद्र यांनी हिंदी कलाविश्वात पदार्पण केलं तेव्हा या पदार्पणासाठी त्यांना 500 रुपयांचं मानधन देण्यात आलं होतं.
8/10
शाहरुखचा पहिला पगार होता अवघे 50 रुपये. हे पैसेही त्यानं एका ट्रेनच्या तिकीटावर खर्च केले होते. ताजमहाल पाहायला जाण्यासाठीच हा सारा आटापिटा त्यानं केला होता. एका मुलाखतीत त्यानं यासंदर्भातील माहिती दिली.
9/10
कोलकाता येथे एका शिपिंग फर्ममध्ये सुरुवातीच्या काळात काम करणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांचा पहिला पगार होता 500 रुपये.
10/10
बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या आणि यशशिखर गाठलेल्या अनेक सेलिब्रिटींचा चाहत्यांना हेवा वाटतो. त्यांची जीवनशैली, राहणीमान, त्यांचा अनोखा अंदाज आणि अर्थातच त्यांना मिळणारं मानधन या साऱ्याबाबत कमालीची उत्सुकता आणि कुतूहल सातत्यानं पाहायला मिळालं आहे. पण, तुम्हाला माहितीये का; लाखो आणि कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या या सेलिब्रिटींनी बरीच मेहनत घेतली, संघर्षही केला तेव्हा कुठं जाऊन ते आज या टप्प्यावर पोहोचले आहेत. त्यामुळं इतरांप्रमाणं त्यांनाही कौतुक आहे ते म्हणजे त्यांच्या पहिल्यावहिल्या पगाराचं....
Published at :