Shibani Dandekar Wedding : जाणून घेऊया जावेद अख्तर यांच्या होणाऱ्या सुनेबद्दल!
shibani
1/9
Farhan Akhtar And Shibani Dandekar Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हे 19 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाची तायरी देखील सुरू झाली आहे. (Photo:shibanidandekar/ig)
2/9
शिबानी आणि फरहान यांचा मेहंदीचा कार्यक्रम देखील पार पडला. शिबानी आणि फरहानच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला शिबानीची बहिण अनुषा दांडेकर, अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि अमृता अरोरा (Amrita Arora) हे उपस्थित होते. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की फरहानची होणारी पत्नी शिबानी ही कोण आहे? जाणून घेऊयात शिबानीबद्दल...(Photo:shibanidandekar/ig)
3/9
शिबानी दांडेकर ही गायिका आहे. तसेच तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. (Photo:shibanidandekar/ig)
4/9
शिबानीनं तिच्या करिअरची सुरूवात अमेरिकेच्या एका टिव्ही शोचे सुत्रसंचालन करून केली.(Photo:shibanidandekar/ig)
5/9
भारतात परत आल्यानंतर शिबानीनं हिंदी शोमध्ये आणि इव्हेंट्समध्ये सूत्रसंचालन केलं. त्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.(Photo:shibanidandekar/ig)
6/9
पण 2019 मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचे सूत्रसंचालन केल्यानंतर शिबानीला विशेष प्रसिद्धी मिळाली.(Photo:shibanidandekar/ig)
7/9
शिबानीनं रॉय या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (Photo:shibanidandekar/ig)
8/9
तिने शानदार, सुल्तान आणि नूर या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही शिबानीची जवळची मैत्रीण आहे.(Photo:shibanidandekar/ig)
9/9
फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट घेतला. अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती.(Photo:shibanidandekar/ig)
Published at : 18 Feb 2022 01:30 PM (IST)