Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने शेअर केला नवा फोटो; फोटो पाहून नेटकरी म्हणाले..
Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे.(photo:priyankachopra/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियांकाच्या चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेनं पाहात असतात. लवकरच तिची Citadel ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(photo:priyankachopra/ig)
या सीरिजच्या शूटिंगमध्ये प्रियांका सध्या व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकानं या वेब सीरिजच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.(photo:priyankachopra/ig)
आता तिनं नुकताच एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाच्या चेहऱ्याला रक्त लागलेलं दिसत आहे. हा फोटो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.(photo:priyankachopra/ig)
प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झालेली दिसत आहे.(photo:priyankachopra/ig)
फोटो शेअर करुन प्रियांकानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुमचा देखील दिवस एवढाच कठिण होता?' कॅप्शनमध्ये अॅक्टर्स लाइफ आणि Citadel या हॅशटॅगचा वापर प्रियांकानं केला आहे.(photo:priyankachopra/ig)
प्रियांकाच्या या फोटो कमेंट करुन एका नेटकऱ्यानं विचारलं, 'चेहऱ्याला नक्की काय झालं आहे?'(photo:priyankachopra/ig)