Celebs Twins Baby : नयनताराआधी 'हे' स्टार्स झाले जुळ्या मुलांचे पालक!
सिनेविश्वात अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी लग्नाच्या काही महिन्यांनंतरच आनंदाची बातमी देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले. यामध्ये आलिया भट्ट-रणबीर कपूर, दिया मिर्झा, नेहा धुपिया यांसारख्या बड्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचवेळी नयनतारा-विघ्नेश, ज्यांना आता साऊथचे हॉट कपल म्हटले जाते, त्यांनीही लग्नाच्या चार महिन्यांनंतरच ट्विन्स बेबीजची बातमी दिली आहे.
जुळ्या मुलांची आई झालेली नयनतारा पहिली अभिनेत्री नाही. त्याच्या आधी अनेक स्टार्स जुळ्या मुलांचे पालकही झाले आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत विघ्नेश शिवनने लिहिले - नयन आणि मी अम्मा आणि अप्पा झालो आहोत. आम्ही खूप भाग्यवान आहोत. आमच्या आयुष्यात जुळी मुले आली आहेत.
7 फेब्रुवारी 2017 रोजी, करण जोहरनेही एक मुलगा आणि मुलगी या जुळ्या मुलांचे स्वागत केल्याचे जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
त्यांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला.
करणच्या मुलांची नावे यश आणि रुही आहे. दोघांसोबत मस्ती करताना करण अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो.
बॉलीवूडचा खलनायक संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी 2010 मध्ये घरात एक मुलगा आणि एक मुलगी या जुळ्या मुलांचे स्वागत केले. या सेलिब्रिटी कपलच्या जुळ्या मुलांची नावे शाहरान आणि इकरा आहेत.
सनी लिओनला निशा, आशर आणि नोहा ही तीन मुले आहेत.
सरोगसीच्या माध्यमातून त्यांना जुळे मुलगे झाले. अभिनेत्रीने सांगितले होते की, जेव्हा तिला सरोगेटद्वारे गर्भधारणा करता आली नाही तेव्हा तिने एक मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
तेलुगू निर्माता, अभिनेता विष्णू मंचू यांनाही जुळ्या मुली आहेत. 2009 मध्ये त्यांनी विराणिका रेड्डीशी लग्न केले.
त्यांच्या जुळ्या मुली एरियाना आणि विवियाना यांचा जन्म २०११ मध्ये झाला.