Kiara Advani : कियारा अद्वाणीच्या सासऱ्यांचे निधन; फोटो शेअर करत दु:ख व्यक्त, भावुक होत म्हणाली...
Kiara Advani : कियारा अद्वाणीच्या सासऱ्यांचे निधन फोटो शेअर करत दु:ख व्यक्त, भावुक होत म्हणाली...

दिवंगत सासरे सुनील मल्होत्रा यांना अभिनेत्री कियारा अद्वाणीचा सन्मान
1/7
मल्होत्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सुनील मल्होत्रा यांच्या निधनानंतर सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी यांनी दु:ख व्यक्त केलं.
2/7
कियारा अडवाणीने आपल्या दिवंगत सासऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे स्मरण केले.
3/7
१८ फेब्रुवारी रोजी कियाराने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये ती आणि Sidharth Malhotra आपल्या लग्नसोहळ्यातील गोड कौटुंबिक क्षण साजरा करत आहेत.
4/7
ज्यात Sunil Malhotra आणि Rima Malhotra सोबत दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये सुनील मल्होत्रा कोट घालून आहेत.
5/7
कियाराने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'सुनील मल्होत्रा यांचे प्रेम आणि कुटुंबासाठी असलेली निस्वार्थ भावना, माझ्या कायम स्मरणात राहिल'. 'त्यांच्या गोष्टी, हास्य, शांत स्वभाव आणि कोमल हृदय नेहमीच आठवणीत राहील', असं कियारानं म्हटलं.
6/7
माहितीनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा यांचे वडील आणि कियाराचे सासरे, मर्चंट नेव्ही कॅप्टन सुनील मल्होत्रा काही काळापासून आजारी होते.
7/7
१७ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थ आणि कियारा सध्या दिल्लीमध्ये आहेत.
Published at : 18 Feb 2026 04:55 PM (IST)