'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत? होणारा नवरा कोण, काय करतो?
ठरलं ..कळवतो लवकरच ! अशी पोस्ट करत तिने लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे.
Continues below advertisement
Dyanada Ramtirthakar
Continues below advertisement
1/7
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा आज साखरपुडा झालाय.
2/7
नुकतीच तिने लग्न ठरल्याची खबर आपल्या चाहत्यांना एका खास पोस्टमधून दिली होती.
3/7
तिचा होणाऱ्या नवरा कोण याविषयी चाहत्यांना मोठी उत्सुकता लागून होती. #HD असा हॅशटॅग वापरत तिने चाहत्यांची उत्सुकता ताणली होती.
4/7
तिच्या साक्षीगंध समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या समारंभातील काही खास क्षण तिने आपल्या सोशल मीडियावरही शेअर केले आहेत.
5/7
ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव हर्षद आत्माराम असे आहे. हर्षद हा एक उत्तम सिनेमेटग्राफर DOP आहे.
Continues below advertisement
6/7
त्याने झॉलिवूड, देऊळ, पोस्टकार्ड हे चित्रपट शूट केले आहेत. तसेच जय जय महाराष्ट्र माझा हा शोही शूट केलाय.हर्षदने 'उर्वरित' हा अवॉर्ड विनिंग लघुपटही केलाय . या लघुपट्याला अनेक नामांकन मिळाली आहेत.
7/7
ज्ञानदा तीर्थकर ही सुद्धा अतिशय गुणी अभिनेत्री आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात राहिलेली ही अभिनेत्री सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्य हे पात्र साकारत आहे.
Published at : 23 Dec 2025 07:48 PM (IST)