Aniket Vishwasrao : प्रसिद्ध मराठी अभिनेत्या विरोधात पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Photo:@aniketvishwasrao/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांनी फिर्याद दिली आहे. (Photo:@aniketvishwasrao/IG)
या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. (Photo:@aniketvishwasrao/IG)
स्नेहा विश्वासराव यांनी दिलेल्या फिर्यादीत करियरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Photo:@aniketvishwasrao/IG)
अनिकेत मूळचा मुंबईचा आहे. 2018 मध्ये त्याचा आणि स्नेहा चव्हाणचा विवाह झाला आहे. (Photo:@aniketvishwasrao/IG)
स्नेहा यादेखील अभिनेत्री असून त्यांनी काही मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. (Photo:@aniketvishwasrao/IG)
दरम्यान मागील काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये ही सतत वाद होत होते. यातूनच स्नेहा यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Photo:@aniketvishwasrao/IG)
अलंकार पोलीस अधिक तपास करीत आहेत. अनिकेतने पोस्टर बॉईज,मस्का, बस स्टॉप या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo:@aniketvishwasrao/IG)
अनिकेतने अभिनयक्षेत्रातील पदार्पण नकळत सारे घडले या नाटकाद्वारे केले. तसेच त्याने ऊन-पाऊस आणि कळत नकळत या मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo:@aniketvishwasrao/IG)