Diwali Makeover Hair Style Look : दिवाळीत या 5 हेअर स्टाईलने स्वत: ला द्या स्टायलिश लुक, घ्या हेअरस्टाईल टिप्स..
दिवाळीपासून भाऊबीज महिला खूप नटतात. वेगळं आणि सुंदर दिसण्यासाठी रोज नवा लुक आणि नवीन हेअरस्टाईल हवी. तुमचा लुक परफेक्ट दिसण्यासाठी आउटफिटनुसार हेअरस्टाइलही महत्त्वाची आहे. साडीपासून ड्रेसपर्यंत कोणत्याही पोशाखासोबत तुम्ही हाफ टाय केस बांधू शकता. यामध्ये तुम्ही समोरचे केस मागे घेऊन केस अर्धे बांधा. अर्धे केस मागून मोकळे राहतात. ते बनवण्यासाठी तुम्ही केसांना सॉफ्ट कर्ल देखील करू शकता. ही हेअरस्टाईल तुम्हाला स्टायलिश लुक देईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफ्रेंच वेणी देखील उत्सवाच्या लुकमध्ये भर घालते. जर तुम्हाला केस सांभाळणे कठीण वाटत असेल तर तुम्ही साडी किंवा ड्रेसमधील लुकवर फ्रेंच वेणी बनवू शकता. ही केशरचना अतिशय सुंदर आणि पारंपारिक लुक देते.
जर तुम्ही दिवाळीला एथनिक कपडे परिधान करत असाल, तर तुम्ही साधी पोनीटेल हेअरस्टाइल देऊन किंवा समोरच्या केसांच्या डाव्या आणि उजव्या बाजूने पातळ वेणी घालून पोनीटेल केशरचना करू शकता. ही केशरचना साडी आणि इतर ड्रेसवरही छान दिसते.
साड्या, ड्रेस आणि गाऊनवरही अगदी हलके कुरळे केसह खूप सुंदर दिसतात. त्याला सांभाळणे देखील खूप सोपे आहे. कर्ल्स आजकाल फॅशन मध्ये आहेत. हे साधे कर्ल तुम्ही घरीही करू शकता.
जर तुम्ही साडी किंवा लेहेंगा घातला असाल तर तुम्ही मेसी बन बनवू शकता. अंबाड्यावर केसांना गजरा लावा किंवा केसांची वेणी बनवून रोल करू शकता.