कास्टिंग काउच' बाबत दिव्यांका म्हणाली..
बॉलिवूडमधील तसेच छोट्या पडद्यावरील काही अभिनेत्रींने त्यांचे कास्टिंग काउचबद्दलचे अनुभव लोकांसोबत शेअर केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतीच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने (Divyanka Tripathi) देखील कास्टिंग काऊचबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती दिली.
दिव्यांकानं सांगितलं की तिने 'कास्टिंग काउच' चा सामना केला आहे. तिला इंडस्ट्रीबद्दल जास्त माहिती न्हवती.
तसेच अनेक लोकांनी तिचे करिअर खराब करण्याची देखील तिला धमकी दिली होती, असं तिने सांगितलं. दिव्यांका पुढे म्हणली, आई-वडील आणि बहिणीमुळे तिला बरोबर आणि वाईट यांमधील फरक समजला.
'करिअरच्या सुरूवातीला मला कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडतं होते त्यामुळे मी पार्टी तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जायला टाळत होते.', असं दिव्यांकानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
मुलाखतीमध्ये दिव्यांका म्हणाली, 'जेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये पहिला ब्रेक मिळतो. तेव्हा अनेक लोक त्याचा फायदा घेतात. तेव्हा तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करावा लागतो. तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला लुटले जाते. सुरूवातीला काही माहित नसल्यामुळे कमी पैसे घेऊन तुम्हाला जास्त काम करावे लागते.'
दिव्यांका पुढे म्हणाली, 'जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा माझं वय लहान होते. मला माहित नव्हते की लोक कशा प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. ही मी टूच्या आधीची गोष्ट आहे. काही लोक तुमच्या सोबत वेगळ्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतात. ते लोक असं सांगतात की कास्टिंग काऊचच्या शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुमचे करिअर संपेल. मला माहित होतं की मला माझ्यात असणाऱ्या टॅलेंटमुळे काम मिळालं. त्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त विचार केला नाही. '
दिव्यांकाच्या ‘बनू मैं तेरी दुल्हन’या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर 'ये है मोहब्बते' या मालिकेमधून दिव्यांका प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच ‘खतरों के खिलाडी 11’या शोमध्ये देखील दिव्यांकाने भाग घेतला होता. (all photo: divyankatripathi/ig)