In Pics : लाईट्स, कॅमेरा, 'शुभमंगल'; केदार शिंदे पुन्हा अडकले विवाहबंधनात
दिग्दर्शक, निर्माते आणि कलाविश्वात प्रकत्येक क्षेत्रात आपली अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या केदार शिंदे यांनी ऐन लॉकडाऊन काळात चक्क दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या विवाहसोहळ्याचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नाला 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळंच केदार शिंदे यांच्या विवाहसोहळ्याच्या हा घाट घातला गेला.
लग्नाचा उपस्थिती लावू न शकलेल्या मंडळींनी आपआपल्या घरातून या समारंभात सहभाग घेतला. मग, यामध्ये वधु पक्षाकडून कन्यादानासाठी आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांनी हजेरी लावली. तर, केदार शिंदे यांच्याकडून प्रशांत गावकर आणि कुटुंबीयांनी हजेरी लावली.
सिद्धार्थ जाधव, शर्मन जोशी यांनीही या सोहळ्यात सहभागी होत वधुवरांस शुभेच्छा देत त्यांचं कौतुकही केलं बरं.
लग्नसमारंभ अतिशय अनोख्या थाटात पार पडला आणि आपआपल्या घरीच राहून पाहुण्यांनी स्वत:च बनलेल्या चवीष्ट जेवणाचा आनंदही घेतला.