Mahesh Manjarekar on Trollers : मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन; महेश मांजरेकर भडकले..

कलाकारांच्या आयुष्यात ट्रोलिंग हा विषय काही नवा नाही. जितकं कलाकारांना त्यांच्या कामावरुन ट्रोल केलं जातं तितकच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही ट्रोल केलं जातं.

(photo:maheshmanjrekar/ig)

1/10
महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
2/10
त्यानिमित्ताने महेश मांजेकरसह संपूर्ण जुनं फर्निचरच्या टीमने 'एबीपी माझाला' मुलाखत दिली. यावर महेश मांजरेकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्यातच त्यांनी ट्रोलिंग या मुद्द्यावरही त्यांचं स्पष्ट मत मांडलं.
3/10
कलाकारांच्या आयुष्यात ट्रोलिंग हा विषय काही नवा नाही. जितकं कलाकारांना त्यांच्या कामावरुन ट्रोल केलं जातं तितकच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही ट्रोल केलं जातं.
4/10
नुकतच अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या लेकाला त्याच्या नावावरुन ट्रोल करण्यात आलं होतं. या सगळ्यावर महेश मांजेकर यांच्या उत्तरानं सगळ्यांचचं लक्ष वेधून घेतलं.
5/10
एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकरांनी म्हटलं की, 'मला या गोष्टीचा भयंकर राग येतो. राग हा यायलाच हवा. लोकं म्हणतात दुर्लक्ष करा. का दुर्लक्ष करायचं. कोणी हक्क दिला तुम्हाला. मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललो आहे का? मी एक सिनेमा बनवतो. तो तुम्ही बघितला, तुम्ही पैसे टाकले त्याच्यासाठी, तुम्हाला हक्का आहे सांगायचा की मला सिनेमा नाही आवडला. माझे पैसे फुकट गेले किंवा मला आवडला माझे पैसे वसूल झाले.
6/10
तुम्ही मला क्रिएटीव्हली क्रिटीसाईज केलंत तर माझं काहीही म्हणणं नाही. कारण तुम्ही माझे प्रेक्षक आहात आणि मी तुमच्या आवडीचा आदर करतो. मी एखादी पोस्ट केली की माझी आई, वडिल, माझी मुलगी, बायकोला बोलायचा हक्क देत नाही कोणाला.मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन.'
7/10
पुढे महेश मांजरेकरांनी यासाठी एक कायदा असावा अशी देखील मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'तुम्ही माझ्या कामावर बोला पण दरवेळी माझ्या आईला का बोलता तुम्ही. मी तुम्हाला वैयक्तिक काही म्हणालो आहे का? एकदा तर माझ्या मुलीबद्दल मी इतकं भीषण काहीतरी लिहिलं होतं मी शोधलं त्याला आणि तक्रार केली. का माफ करावं अश्यांना. पण हे कधी संपेल जेव्हा सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्यासाठी एक कायदा तयार केला जाईल, तेव्हा हे सगळं लगेच संपेल.'
8/10
महेश मांजरेकरांनी त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
9/10
यावर एका व्यक्तीने अत्यंत अश्लील भाषेत कमेंट केली होती. त्याला महेश मांजरेकरांनी सणसणीत उत्तर देखील दिलं.
10/10
पण त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांनी पोलिसांत तक्रार देखील नोंदवली होती. (photo:maheshmanjrekar/ig)
Sponsored Links by Taboola