Dilip Joshi : वाढदिवसानिम्मित जाणून घ्या प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशीबद्दलच्या या खास गोष्टी!
Dilip Joshi : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमुळे दिलीप यांना विशेष लोकप्रियता मिळाली.(photo:maakasamdilipjoshi/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2008 मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. तेव्हा पासूनच या मालिकेमधील जेठालाल ही भूमिका दिलीप जोशी हे साकारत आहेत.(photo:maakasamdilipjoshi/ig)
दिलीप जोशीने स्वतः एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, तेव्हा ते ज्या मालिकेत काम करायचे ती मालिका बंद झाली. त्यामुळे जवळपास एक वर्ष त्यांच्याकडे कोणतेही काम नव्हते. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्र सोडण्याचा देखील निर्णय घेतला होता. पण नंतर त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेती ऑफर मिळाली आणि त्याचे संपूर्ण नशीब पलटले.(photo:maakasamdilipjoshi/ig)
कधीकाळी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करुन 50 रुपये मानधन घेणारे दिलीप जोशी हे सध्या कोट्यवधींचे मालक आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या एका एपिसोडसाठी दिलीप हे 1.5 लाख रुपये मानधन घेतात.(photo:maakasamdilipjoshi/ig)
एका रिपोर्टनुसार, दिलीप जोशी यांच्याकडे Audi Q-7 ही लग्झरी गाडी आहे. तसेच त्यांचे मुंबईमध्ये आलिशन घर देखील आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप जोशी यांनी ब्लॅक कलरची Kia Sonet ही सबकॉम्पॅक्ट SUV गाडी घेतली. या गाडीची किंमत 12.29 लाख रूपयांपासून सुरू होते. दिलीप यांनी दिवाळीला ही गाडी घेतली आहे.(photo:maakasamdilipjoshi/ig)
दिलीप जोशी यांनी 'मैने प्यार किया', 'वन 2 का 4', 'ढूंढते रह जाओगे', 'वॉट्स योर राशि', 'खिलाड़ी 420', 'हमराज' आणि 'फिराक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी 'दो और दो पांच', 'हम सब बाराती', 'कोरा कागज' आणि 'दाल में काला' या टिव्ही शोमध्ये देखील काम केले आहे.(photo:maakasamdilipjoshi/ig)