PHOTO : नर्गिस यांनी सुनील दत्तसोबत लग्न केल्यानंतर दारुच्या नशेत रात्रभर रडायचे राज कपूर- काय आहे प्रकरण?
Feature_Photo_5_(1)
1/7
राज कपूर बॉलिवूडचे शो मॅन म्हणून ओळखले जायचे. एक चांगला अभिनेता असण्याबरोबरच ते एक निर्माते, दिग्दर्शक देखील होते. त्यांनी अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली. आवारा, श्री 420, चोरी चोरी, अनाडी, बूट पॉलिश, अब दिल्ली दूर नहीं, सपनों का सौदागर असे एकाहून एक सिनेमे त्यांनी केले.
2/7
राज कपूर यांनी 1948 मध्ये आग सिनेमामध्ये नर्गिस यांच्यासोबत काम केलं. तेव्हापासून ते नर्गिस यांच्या प्रेमात पडले. नर्गिस या देखील राज कपूर यांच्याशी डेडिकेटेड होत्या त्यांनी राज कपूर यांच्या सिनेमांसाठी पैसा देखील लावला होता.
3/7
राज कपूर यांचं लग्न आधी झालेलं होतं. त्यांना मुलं देखील होती. असं असतानाही नर्गिस यांच्याशी त्यांचं नात जुळलं होतं. नर्गिस राज कपूर यांच्याशी लग्नाला तयार होत्या मात्र राज कपूर त्यांची पत्नी कृष्णाला सोडण्यास तयार नव्हते.
4/7
जवळपास 9 वर्षांपर्यंत राज कपूर आणि नर्गिस यांच्यात जवळीक राहिली. या दरम्यान नर्गिस यांनी अनेकदा राज कपूर यांच्याशी लग्नाची मागणी केली मात्र तसं होऊ शकलं नाही. शेवटी दोघांचं ब्रेकअप झालं.
5/7
1958 मध्ये नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्न करत सर्वांना धक्का दिला. राज कपूर यांना ज्यावेळी नर्गिस यांच्या लग्नाची बातमी कळाली त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला.
6/7
राज कपूर यांची पत्नी कृष्णा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यानंतर राज कपूर रात्रभर दारु पिऊन रडत बसायचे.
7/7
राज कपूर यांना वाटत होतं की, नर्गिस यांनी त्यांना धोका दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार राज कपूर नर्गिस यांच्यावर इतके नाराज होते की, ते 1981 मध्ये नर्गिस यांच्या अंत्यविधीला दुरुनच उपस्थित राहिले.
Published at : 22 May 2021 03:49 PM (IST)