Salman Khan : सलमान खानने गुपचूप केलं लग्न?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा लग्न कधी करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडत असतो. आता नुकताच त्याचा एक खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (photo:beingsalmankhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या फोटोमध्ये सलमान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) दिसत आहे. या फोटोमुळे आता या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घेऊयात....

2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील सोनाक्षी आणि सलमान खान यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांच्या अफेअरबाबत त्यावेळी चर्चा सुरू होत्या. आता या दोघांचा एक फोटो व्हायरल झाल्यानं यांनी गुपचूप लग्न केलं आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (photo:aslisona/ig)
पण हा फोटो एडीट केला आहे. एका नेटकऱ्यानं सोनाक्षी आणि सलमान यांचा फोटो एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोमध्ये सोनाक्षी ही रेड कलरची साडी, गोल्ड ज्वेलरी आणि सिंदूर अशा लूकमध्ये दिसत आहे. तर सलमान हा व्हाईट शर्ट आणि क्रिम कलरचा ब्लेजर अशा लूकमध्ये दिसत आहे. (photo:aslisona/ig)
सलमान खानचं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि ऐश्वर्या राय या अभिनेंत्रीसोबत नाव जोडण्यात आलं होतं. लवकरच सलमानचा टायगर -3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (photo:beingsalmankhan/ig)