धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर 31व्या दिवशीही धमाका; छावा चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड्स मोडले, 'इतक्या' कोटींची केली कमाई
Dhurandhar Dominates Box Office: धुरंधर चित्रपटाने प्रदर्शनाचे चार आठवडे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. पाचव्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरलाय.
Continues below advertisement
Dhurandhar Dominates Box Office
Continues below advertisement
1/10
2025 मध्ये धुरंधर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने सिनेसृष्टीतील बरेच रेकॉर्ड्स मोडले. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला, तरीही हा चित्रपट पाहण्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कमी झालेली नाही. या चित्रपटातील तगडी स्टारकास्टने प्रेक्षकांना भुरळ घातली. या चित्रपटाने प्रदर्शनाचे चार आठवडे यशस्वीरित्या पूर्ण केले. तसेच पाचव्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम आपल्या नावे केला.
2/10
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह अभिनीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली प्रभावी कामगिरी सुरूच ठेवली आहे. दरम्यान, धुरंधर चित्रपटाने पाचव्या रविवारी किती कमाई केली, जाणून घेऊयात.
3/10
धुरंधर हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. यादरम्यान, या काळात अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. तसेच बॉक्स ऑफिसवर पडले देखील. परंतु, धुरंधर हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर स्थिरावला आहे. या चित्रपटाने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
4/10
पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 207.25 कोटींची कमाई केली. तर, दुसऱ्या आठवड्यात 253.25 कोटी रूपयांची कमाई केली. तर, तिसऱ्या आठवड्यात 172 कोटी रूपयांची कमाई केली.
5/10
चौथ्या आठवड्यात 106.5 कोटी कमावले. तसेच एक महिन्यानंतर म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने 11.75कोटी कमावले.
Continues below advertisement
6/10
सॅकनिल्कच्या सुरूवातीच्या ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, धुरंधरने रिलीजच्या 31 व्या दिवशी म्हणजेच 5 व्या रविवारी 12.75 कोटी रूपये कमावले आहेत.
7/10
धुरंधर या चित्रपटाची 31 दिवसांत एकूण कमाई 772.5 कोटी रूपये झाली आहे.
8/10
धुरंधरने अधिकृतपणे विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाला मागे टाकत पाचव्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे.
9/10
दरम्यान, प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला तरीही 'धुरंधर' या चित्रपटाने आपला विक्रमी प्रवास सुरू ठेवला आहे.
10/10
दरम्यान, आगामी चित्रपटाचे धुरंधर मोडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Published at : 05 Jan 2026 10:26 AM (IST)